आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • Bharti Singh Has Taken A 70 Per Cent Pay Cut For Dance Deewane And Around 50 Per Cent For The Kapil Sharma Show

टीव्ही इंडस्ट्रीवर कोरोनाचा परिणाम:भारती सिंगच्या मानधनात मोठी कपात, म्हणाली- 'मला 50 ते 70 टक्के कमी मानधनात काम करावे लागत आहे'

11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भारतीने आपल्या मानधनात मोठी कपात केल्याचे सांगितले आहे.

कोरोनाने सामान्यांसोबतच चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीचे कंबरडे मोडले आहे. गेल्या वर्षीपासून थिएटरमध्ये चित्रपट प्रदर्शित होऊ शकले नाहीत आणि टीव्ही मालिकांचे शूटिंगही रखडले होते. अशा परिस्थितीत कलाकारांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले. बर्‍याच कलाकारांकडे काम नाहीये आणि ज्यांच्याकडे काम आहे, त्यांना आपल्या मानधनात मोठी कपात करावी लागली आहे. असेच काहीसे प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंगच्या बाबतीतही घडले. भारतीने आपल्या मानधनात मोठी कपात केल्याचे सांगितले आहे.

मानधन 50 ते 70 टक्क्यांनी केले कमी

एका मीडिया रिपोर्टनुसार, 'डान्स दिवाने' हा शो होस्ट करण्यासाठी भारतीला तिची फी 70 टक्क्यांनी कमी करावी लागली आहे. यासोबतच भारतीला 'द कपिल शर्मा शो'साठी 50 टक्के कमी मानधन मिळाले आहे. याबाबत भारती म्हणाली, "प्रत्येकाला पे-कटचा सामना करावा लागतोय आणि मीसुद्धा त्याला अपवाद नाही. मी बरेच निगोशिएशन केले, पण काही उपयोग झाला नाही. गेल्या वर्षभरापासून काम बंद पडले आहे. टीव्ही आणि कार्यक्रमांना प्रायोजक मिळत नसल्याने चॅनेल तरी पैसे कुठून आणतील, असा मी विचार केला. प्रत्येकजण आपल्या पायावर पुन्हा उभे राहण्याचा प्रयत्न करीत आहे. एकदा कार्यक्रमांना चांगली रेटिंग्ज मिळू लागली तर प्रायोजक आपोआप परत येतील आणि आमची फीदेखील वाढेल,' असे भारतीने सांगितले.

भारती पुढे म्हणाली, 'बर्‍याच वर्षांपासून आम्ही एका वाहिनीवर काम करतो आणि ते आमचा प्रत्येक शब्द पाळतात. म्हणून आज जेव्हा त्यांना मदतीची गरज आहे, तेव्हा कुठल्याही कलाकाराने नकार दिला असेल, असे मला वाटत नाही. जेव्हा सर्व काही ठिक होते, तेव्हा चॅनेलने आमचा प्रत्येक शब्द पाळला आणि आमची प्रत्येक मागणी पूर्ण केली. मला माहित आहे प्रत्येकाला कमी पैसे मिळत आहेत. पण मला असे वाटते की जे तंत्रज्ञ सेटवर काम करत आहेत, त्यांच्या मानधनात कपात करू नयेत. आम्ही सर्वजण एकत्र काम करीत आहोत आणि या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत आहोत. एक काळ असा होता की सर्व काही बंद होते आणि आम्ही घरी बसलो होतो. आम्ही विचार करत होतो की काम केव्हा सुरू होईल. जर कुणी कमी मानधनात जरी काम दिले तरी आम्ही ते करायला तयार आहोत. कारण लोकांना आपली घरं चालवावी लागतात. काही महिन्यांत सर्व काही रुळावर येईल आणि सर्व काही ठीक होईल,' अशी आशा भारतीने व्यक्त केली आहे.

'द कपिल शर्मा शो' च्या टीमसोबत भारती सिंग.
'द कपिल शर्मा शो' च्या टीमसोबत भारती सिंग.

कमबॅकमुळे आनंदी आहे भारती
स्टँड-अप कॉमेडी शो 'द कपिल शर्मा शो' परत येत असल्याने भारती खूप खूश झाली आहे. ती म्हणाली, 'आम्ही सात महिन्यांनंतर परत येत आहोत. अशा महामारी दरम्यान कॉमेडी शो येणे आवश्यक आहे.'

हा कार्यक्रम यावर्षी जानेवारीत बंद झाला होता. कोरोनाच्या काळात शूटिंगच्या जोखमीमुळे आणि कपिल शर्मा दुस-यांदा वडील होणार असल्याने शोला काही काळ ब्रेक देण्यात आला होता.

बातम्या आणखी आहेत...