आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खरंच भारती सिंग प्रेग्नेंट आहे?:कॉमेडियन भारती सिंह 2021 मध्ये आई होणार, डमी बाळाला हातात घेऊन म्हणाली - 2021 मध्ये हे वास्तवात होणार आहे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भारती सिंगने सात वर्षांच्या रिलेशनशिपनंतर हर्ष लिम्बचियासोबत 3 डिसेंबर 2017 रोजी लग्न केले होते. दोघांची भेट कॉमेडी सर्कसच्या सेटवर झाली होती. हर्ष लेखक आहे.

कॉमेडियन आणि टीव्ही होस्ट भारती सिंग आता लवकरच आई होणार आहे. 'इंडियाज बेस्ट डान्सर' या नृत्य रिअॅलिटी शोच्या सेटवर तिने पती आणि को-होस्ट हर्ष लिम्बचियाला पुढील वर्षी आपल्या पहिल्या बाळाची आई होणार असल्याचे वचन दिले आहे.

36 वर्षीय भारतीच्या हातात या शोच्या सेटवर एक डमी बाळ होते. यावेळी ती म्हणाली, "मी नॅशनल टीव्हीवर एक घोषणा करत आहे. 2020 मध्ये हे बेबी खोटे आहे, मात्र 2021 मध्ये ते वास्तवात येणार आहे." तिच्या या वक्तव्यानंतर भारती गर्भवती असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

भारतीने हर्षबरोबरच्या तिच्या नात्याबद्दलही मन मोकळे केले
एपिसोड दरम्यान भारतीने हर्षबरोबरच्या तिच्या नात्याबद्दलही सांगितले. ती म्हणाले की, तारुण्यात पदार्पण केल्यानंतर ख-या प्रेमाचा अर्थ समजण्यास सुरुवात झाली आणि हर्ष माझ्या आयुष्यात प्रेम म्हणून आला. मी माझ्या दिवसाची सुरुवात माझ्या देवाचा (हर्ष) चेहरा पाहून करते. हर्षशिवाय मी माझ्या जीवनाची एक सेकंददेखील कल्पना करु शकत नाही", असे ती म्हणाली.

2020 मध्ये केला होता फॅमिली प्लानिंगचा विचार
भारतीने एका मुलाखतीत सांगितले होते की, तिला 2020 मध्ये आई व्हायचे आहे. मात्र कोरोनामुळे त्यांनी आपला हा विचार बदलला. याविषयी ती म्हणाली, 'मी आणि हर्षने 2020 मध्ये फॅमिली प्लानिंगचा विचार केसा होताय मात्र कोरोना व्हायरसमुळे आम्ही आमचा विचार बदलला. आम्हाला कोणतीही रिस्क घ्यायची नाहीये. एवढ्या टेंशनमध्ये आम्ही बेबी प्लान करु शकत नाही. माझ्या बाळाचा जन्म चांगल्या वातावरणात व्हावा अशी माझी इच्छा आहे.'

बातम्या आणखी आहेत...