आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कॉमेडियन भारती सिंगने 'द कपिल शर्मा शो'च्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. तिने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शोच्या सेटवरुन काही फोटो शेअर केले आहेत. ज्यावरुन तिची शोमधून हकालपट्टी झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. फोटो भारती लाल रंगाचा सलवार सूटमध्ये दिसतेय. “दोन हृद्यांचा मेळ घालणारा लाल रंग. कपिल शर्मा शो प्रत्येक शनिवार ते रविवारी रात्री 9.30 वाजता", असे कॅप्शन भारतीने फोटोला दिले आहे. भारतीच्या पोस्टवरून हे स्पष्ट झाले की, ती शोच्या शूटिंगवर परत आली आहे.
ड्रग्ज प्रकरणात अडकली आहे भारती
भारती आणि तिचा नवरा हर्ष लिंबाचिया यांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) गांजा बाळगल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. एनसीबीने त्यांच्या घर आणि ऑफिस या दोन्ही ठिकाणी छापे टाकून गांजा जप्त केला होता. तसेच चौकशीदरम्यान पती-पत्नीने गांजा सेवन केल्याचे मान्य केले होते. नंतर त्यांना प्रत्येकी पंधरा हजार रुपयांच्या जातमुचलकल्यावर जामीन मंजूर झाला होता. या प्रकरणामुळे भारतीवर बरीच टीका झाली होती. त्यानंतर कपिल शर्मा शोमध्ये काम करणार्या भारतीला चॅनल आणि मेकर्सनी शोमधून काढून टाकले होते, अशा बातम्या आल्या होत्या. पण आता हे वृत्त निराधार असल्याचे सिद्ध झाले आहे.
टीमने पाठिंबा दर्शवला होत्या
भारतीच्या या अडचणीच्या काळात कपिल शर्मा शोची टीम तिच्याबरोबर उभी असल्याचे दिसून आले. या शोमध्ये सपनाची भूमिका साकारणार्या कृष्णा अभिषेकने एका मुलाखतीत सांगितले होते की, "तिने कामावर परत यायला हवे, जे झाले ते झाले. मी आणि कपिल शर्मा तिच्यासोबत आहोत. तिला माझा पूर्ण पाठिंबा आहे.'
भारती सिंग कोण आहे?
भारती सिंग एक स्टँडअप कॉमेडियन आणि अभिनेत्री आहे. भारतीने 2017 मध्ये लेखक हर्ष लिंबाचियाशी लग्न केले. भारतीने इंडियन लाफ्टर चॅलेंज या शोपासून आपल्या करियरची सुरुवात केली. त्यानंतर तिने कॉमेडी सर्कस, कॉमेडी सर्कस महासंग्राम, कॉमेडी सर्कस का जादू, कहानी कॉमेडी सर्कस की आणि कॉमेडी नाइट्स बचाओ यासह अनेक विनोदी कार्यक्रमांमध्ये काम केले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.