आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

छोट्या पडद्यावर कमबॅक:गुन्हेगारीवर आधारित 'मौका-ए-वारदात'मध्ये झळकणार भोजपुरी मेगास्‍टार रवी किशन

13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'मौका-ए-वारदात' हा कार्यक्रम येत्या 9 मार्च पासून सायंकाळी 7 वाजता दर सोमवार ते शुक्रवार एण्‍ड टीव्‍हीवर प्रसारित होणार आहे.

छोट्या पडद्यावर नव्याने दाखल होत असलेल्या क्राइमवर आधारित 'मौका-ए-वारदात' या कार्यक्रमात भोजपुरी मेगास्‍टार रवी किशन सूत्रसंचालकाची भूमिका पार पाडताना दिसणार आहे. रवीराज क्रिएशन्‍स, हेमंत प्रभू स्‍टुडिओज, एअॅण्‍डआय प्रॉडक्‍शन्‍स आणि स्‍पेसवॉकर फिल्‍म्‍स निर्मित 'मौका-ए-वारदात' ही लक्षेवधक साप्‍ताहिक क्राइम मालिका आहे. ही मालिका रहस्‍यमय गुन्‍हेगारी प्रकरणांना दाखवते, ज्‍या प्रेक्षकांच्‍या मनाला विचलित करतील आणि त्‍यांना 'वास्‍तव कल्‍पनेपेक्षा अपरिचित आहे' या वाक्‍यावर विश्‍वास ठेवण्‍यास भाग पाडतील.

मागील काही दिवसांपासून टेलिव्हिजनपासून दूर असलेल्‍या रवी किशनला पुनरागमन करण्‍याचा आनंद झाला आहे. या मालिकेबाबत सांगताना रवी म्‍हणाले, ''मला या मालिकेचा भाग होण्‍याचा आनंद झाला आहे. मी विविध गुन्‍हेगारी केसेसना दाखवणार आहे. या केसेस वास्‍तविक घटनांमधून प्रेरित आहेत आणि सर्वात अकल्‍पनीय गुन्‍ह्यांच्‍या विविध कथांना दाखवतात. तसेच गुन्‍ह्यामागील रहस्‍य, हेतू व पद्धतींना सादर करतात. क्राइम आधारित मालिकांनी माझे नेहमीच लक्ष वेधून घेतले आहे.''

रवी पुढे म्हणाले, 'मी अशा मालिकांना लक्षवेधक व माहितीपूर्ण मानतो. यामुळे मला आपल्‍या अवतीभोवती घडणा-या गुन्‍ह्यांचे प्रकार आणि आपण त्‍याबाबत कशाप्रकारे जागरूक व दक्ष राहू शकतो, याबाबत समजते. या शैलीवर आधारित अनेक मालिका बनवण्‍यात आल्‍या आहेत, पण माझ्या मते 'मौका-ए-वारदात' ही इतरांपेक्षा वेगळी मालिका आहे. सविस्‍तरपणे संकल्‍पना जाणून घेतल्‍यानंतर मला समजले की, मालिकेमध्‍ये विश्‍वासापलीकडील अविभाज्‍य व अविश्‍वसनीय गुन्‍हेगारी कथांची नवीन वेगळी संकल्‍पना आहे, जी लोकांच्‍या मनात प्रश्‍न निर्माण करेल की 'हे असे-कसे झाले?' प्रेक्षक क्राइम मालिका पाहतात तेव्‍हा त्‍यांच्‍या मनात 'हे कसे घडले', 'हे कोणी केले' आणि 'पुढे काय घडेल' असे प्रश्‍न निर्माण होतात. पण ही मालिका त्‍यांना 'हे कशाप्रकारे घडले' यापेक्षा 'हे कोणी केले' विचारण्‍यास भाग पाडेल. मी मालिका सुरू होण्‍यास अत्‍यंत उत्‍सुक आहे. मालिकेसाठी अथक मेहनत घेण्‍यात आली आहे आणि अर्थातच यामध्‍ये सर्व प्रेक्षकांचे प्रेम, पाठिंबा व आपुलकी आहे.''

बातम्या आणखी आहेत...