आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्शीचे स्वयंवर:अर्शी खानने 'स्वयंवर'मध्ये आयुष्याच्या जोडीदाराची निवड करण्यासाठी सलमान खानकडे मागितली मदत

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आयुष्याचा जोडीदार शोधताना अभिनेता सलमान खानने मदत करावी अशी अर्शीची इच्छा आहे.

'बिग बॉस 14' फेम अर्शी खानने लग्न करुन संसार थाटण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यासाठी ती छोट्या पडद्यावर स्वतःचे स्वयंवर थाटरणार आहे. तिचा हा कार्यक्रम लवकरच सुरु होणार असून याविषयी अलीकडेच एका मुलाखतीत तिने सांगितले आहे. अर्शीचा लवकरच स्वयंवर शो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आयुष्याचा जोडीदार शोधताना अभिनेता सलमान खानने मदत करावी अशी अर्शीची इच्छा आहे.

या शोबद्दल बोलताना अर्शी खान म्हणाली, 'मला वाटतं सलमान सरांनी नवरा शोधण्यासाठी मदत करायला हवी. ते एकटेच आहेत ज्यांनी मला माझ्या करिअरमध्ये पुढे जाण्यास आणि यशस्वी होण्यास मदत केली आहे. बिग बॉसच्या घराने मला आयुष्यभरासाठी शिकवण दिली आहे.' 'स्वयंवर' या शोच्या फॉर्मेटनुसार अर्शीला कोणाला आपला नवरा म्हणून निवडायचे आहे आणि कोणाला नाही हे ती स्वतः ठरवणार आहे.

स्वयंवरनंतर ओटीटी प्रोजेक्ट्सवर काम सुरु करणार
'विश' आणि 'सावित्री देवी कॉलेज अँड हॉस्पिटल' या मालिकांमध्ये दिसलेल्या अर्शी खानने पुढे सांगितले की, 'स्वयंवर'नंतर ती ओटीटी प्लॅटफॉर्मसाठीही काम करणार आहे. सध्या तिच्याकडे बऱ्याच ऑफर असल्याचेही तिने सांगितले. मात्र सध्या स्वयंवर या शोमध्ये बिझी असल्याने कोणत्याही ऑफर स्वीकारता येत नसल्याचे तिने सांगितले. पण यासोबतच या शोचे शूटिंग संपल्यानंतर पुन्हा एकदा अभिनयाच्या दुनियेत कमबॅक करणार असल्याचे तिने सांगितले.

राहुल महाजन अर्शीचा 'स्वयंवर' हा शो करणार होस्ट?
'बिग बॉस' फेम राहुल महाजन हा शो होस्ट करणार असल्याचेही ऐकिवात आहे. याबद्दल राहुल महाजनने एका मुलाखतीत सांगितले होते की, 'मी मस्करीत अर्शीला म्हणालो होतो की, जेव्हा तू स्वयंवर थाटशील तेव्हा मी तो शो होस्ट करेल. कारण मी या कॉन्सेप्टशी जुळलो होतो. मात्र अद्याप मला या शोची ऑफर आलेली नाही. जर मला चॅनलकडून तशी ऑफर आली तर मी ती नक्की स्वीकारेल. अर्शी माझी खूप चांगली मैत्रीण आहे. आणि मी नक्की तिच्यासाठी हा शो करेन." अर्शी आणि राहुल दोघेही 'बिग बॉस'च्या 14 व्या पर्वात एकत्र दिसले होते.

बातम्या आणखी आहेत...