आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
टेलिव्हिजनवरील सर्वात वादग्रस्त रिअॅलिटी शो म्हणून ओळखला जाणा-या 'बिग बॉस'चे नवे पर्व लवकरच सुरु होत आहे. या पर्वातदेखील बॉलिवूड अभिनेता सलमान खान हा शो होस्ट करताना दिसणार आहे. मागील पर्वाप्रमाणेच यावेळीही चित्रीकरण मुंबईतील फिल्मसिटी येथे होत आहे.
हा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी दैनिक भास्करने आर्ट डायरेक्टर ओमंग कुमार यांच्याशी खास बातचीत केली. यात त्यांनी सांगितले की, 'बिग बॉस देगा 2020 को जवाब' या थीमला डोळ्यासमोर ठेऊन त्यांनी घर डिझाइन केले आहे. ओमंग यांच्या म्हणण्यानुसार, हे घर एक अल्ट्रामॉडर्न आहे जे आगामी काळात स्पर्धकांना अधिक मनोरंजन देईल.
कोरोनाच्या काळात झाले काम
ओमंग सांगतात, "यावर्षी घराचे डिझाइन करणे खूप आव्हानात्मक होते. कोविडच्या काळात आम्ही हे घर बांधले होते, याकाळात आमच्याकडे पुरेसे कामगार नव्हते, अनेकजण आपल्या गावी परतले होते. सोबतच अशी भीती होती की, लोक एकत्र आले तर त्यांना कोरोनाची लागण होऊ नये.
ज्यावेळी आम्ही घराची रचना करीत होतो, तेथे कोरोना विषाणूचा प्रारंभिक टप्पा होता. बाहेरचे वातावरण पूर्णपणे निर्जन होते. आयुष्यात कधीही विचार केला नव्हता की, अशा वातावरणात काम करावे लागले. सद्य परिस्थिती लक्षात घेऊन मी आणि वनिता (ओमंगची पत्नी)ने घराचे डिझाइन अंतिम केले."
अवघ्या 45 दिवसांच्या आत घर उभारले
ते पुढे म्हणतात, "हे घर बनवताना आम्हाला अनेक अडचणी आळ्या. आम्ही सेटवर 50 हून अधिक कामगार आणू शकत नव्हतो. मास्क घालून आणि सामाजिक अंतर पाळुन काम करणे सोपे नव्हते. सुमारे 45 दिवसांच्या आत आम्ही हे घर उभारले आहे."
यावर्षी संपूर्ण डिझाइनची शैली बदलावी लागली
घराच्या रचनेबाबत ओमंग स्पष्ट करतात, "कोविड लक्षात ठेवून स्पा, सिनेमा आणि मॉल सर्व बंद पडले आहेत आणि आम्ही ते सर्व घराच्या आत बनवले आहे. आम्ही स्पर्धकांना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.'
यावर्षी आम्हाला डिझाइनची संपूर्ण शैली बदलावी लागली. स्पेस शिप प्रमाणेच संपूर्ण घर वेब डिझाइन केलेले आहे. येथे सिंगल आणि डबल बेड आहेत, जे थोड्या अंतरावर तयार केलेले आहेत. मेटालिक फिनिश आणि गडद रंगाचा अधिक वापर केला आहे.
"आतापर्यंत प्रेक्षक स्पर्धकाना एकत्र बसून जेवताना पाहत आले आहे. पण या पर्वात तसे होणार नाही. आम्ही टेबल कॅफेटेरियाप्रमाणे 4 भागांमध्ये केले आहे. स्वयंपाकघरातील टेबल पूर्णपणे बदलले आहे. ट्रान्सपरंट चेअर देखील असतली, यावेळी तरुंग नाही, पण स्विमिंग पूल नक्की आहे.'
सलमानच्या घराला मेक्सिकन फिल दिला
होस्ट सलमान खानच्या घराच्या रचनेबाबत ओमंग सांगतात, "आम्ही सलमानच्या घराला मेक्सिकन फिल दिला आहे ज्यामध्ये भरपूर वुडन टेक्सचरचा वापर केला आहे. त्याच्या घराच्या रंगात आम्ही केशरी आणि पिवळ्या रंगाचा जास्त वापर केला आहे."
बिग बॉस हाऊसमध्ये आहेत या लक्झरी सुविधा
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.