आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • Bigg Boss 14: After Aly Goni, Kavita Kaushik And Jasmine Bhasin Will Also Get Evicted, These 3 Contestants Including Eijaz Khan, To Be Finalists Of The Show

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बिग बॉस 14 फिनाले वीक:अली गोनीनंतर कविता कौशिक आणि जास्मिन भसीन बेघर, एजाज खानसह हे स्पर्धक पोहोचले अंतिम फेरीत

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शोचा महाअंतिम सोहळा जानेवारीच्या पहिल्या आठवड्याऐवजी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे.

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त रिअॅलिटी शो बिग बॉस 14 ला आपले पहिले टॉप 4 फायनलिस्ट मिळाले आहेत. यंदाच्या सीझनमध्ये शोचा महाअंतिम सोहळा जानेवारीच्या पहिल्या आठवड्याऐवजी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. सलमान खानने या आठवड्याच्या ‘वीकेंड का वार’मध्ये ‘फिनाले’ सुरू झाल्याचे घोषित केले होते. त्याचवेळी सलमानने सांगितले होते की, या आठवड्यात केवळ चार स्पर्धक पुढे जातील आणि बाकीच्यांना घरचा रस्ता दाखवला जाईल.

मीडिया रिपोर्टनुसार ‘बिग बॉस’ने मंगळवारी एक टास्क दिला होता. त्या टास्कमध्ये हरल्यामुळे अली गोनी घराबाहेर पडला. तर आणखी एका टास्कदरम्यान जास्मिन भसीन आणि निक्की तंबोली बाहेर पडल्या. त्याचवेळी कविता कौशिकसुद्धा घराबाहेर पडली आहे. टास्कमध्ये राहून नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल कविताला बिग बॉसने शिक्षा दिली आणि तिला घराच्या बाहेर जाण्यासाठी सांगितले.

हे शोचे 4 फायनलिस्ट होतील

एजाज खानने नुकतीच इम्यूनिटी स्टोन जिंकून स्वतःला या सीझनमधील पहिला फायनलिस्ट असल्याचे सांगितले. त्याच्या शिवाय रुबीना दिलैक, अभिनव शुक्ला आणि राहुल वैद्य हेदेखील ट्रॉफी जिंकण्याच्या शर्यतीत अंतिम फेरीत पोहोचले आहेत.

फायनलिस्टचा होणारा सीनिअर कंटेस्टंट्ससोबत मुकाबला
यावर्षी, निर्मात्यांनी 14 वे पर्व अधिक मनोरंजक करण्यासाठी मोठे ट्विस्ट आणले आहेत. शोच्या सुरूवातीला मागील पर्वातील काही स्पर्धक झळकले होते. आता पुन्हा एकदा टॉप 4 स्पर्धकांना टक्कर देण्यासाठी मागील काही पर्वाचे स्पर्धक अंतिम फेरीत सहभागी होणार आहेत. मास्टर माइंड विकास गुप्ता, कश्मीरा शाह, राहुल महाजन, राखी सावंत आणि अर्शी खान लवकरच शोमध्ये एंट्री करणार आहेत. या सदस्यांना या पर्वात ट्रॉफी आणि बक्षिसाची रक्कम जिंकण्याचे अधिकारही असतील.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser