आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • Bigg Boss 14: Aijaz Khan Revealed On National Television, There Were Only 4 Thousand In My Bank Account,i Borrowed Money From Friends To Give Advance.

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बिग बॉस 14:एजाज खानचा नॅशनल टेलिव्हिजनवर खुलासा - बँक खात्यात फक्त 4 हजार होते, अ‍ॅडव्हान्स देण्यासाठी मित्रांकडून पैसे उसणे घेतले होते

25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लॉकडाऊन दरम्यान एजाज आर्थिक संकटात सापडला होता.

टेलिव्हिजनवरील बिग बॉस 14 या वादग्रस्त रिअॅलिटी शोमधील स्पर्धक एजाज खान सतत चर्चेत आहे. घराचा कॅप्टन होण्यापासून ते कविता कौशिकसोबतच्या भांडणामुळे तो आठवडाभर लाइमलाइटमध्ये राहिला. मंगळवारी बिग बॉसच्या घरात झालेल्या नॉमिनेशन प्रक्रियेत त्याने आपल्या मित्रांऐवजी जास्मिनला सुरक्षित करुन प्रत्येकासोबत थेट पंगा घेतला आहे. या आठवड्यात बेघर होण्यासाठी नैना सिंह, शार्दुल पंडित, राहुल वैद्य आणि रुबीना दिलक यांना नॉमिनेट करण्यात आले आहे. या नॉमिनेशनंतर, शार्दुल खूप निराश झाला आहे. त्याला प्रोत्साहन देण्यासाठी एजाजने आपल्या आर्थिक अडचणींविषयी त्याला मनमोकळेपणाने सांगितले.

सध्या नॉमिनेट झालेले चारही सदस्य रेड झोनमध्ये आहेत. लॉकडाऊन दरम्यान शार्दूल आर्थिक संकटात सापडला होता, आर्थिक परिस्थिती सुधारावी यासाठी त्याला जास्तीत जास्त काळ घरात राहायचे आहे.

  • एजाज शार्दुलला म्हणाला - मला या शोची जास्त गरज आहे

एजाजने शार्दुलला आपल्या हलाखीच्या परिस्थितीविषयी सांगितले. तो म्हणाला, मलासुद्धा या शोची नितांत गरज आहे. माझ्या खात्यात फक्त चार हजार रुपये होते. अ‍ॅडव्हान्स देण्यासाठी मी मित्राकडून दीड लाख रुपये उसणे घेतले. तू हार मानू नको. रड, आपला राग व्यक्त कर.

शोमध्ये एन्ट्री घेताना शार्दुलने सलमान खानला सांगितले होते की, लॉकडाऊन दरम्यान तो आर्थिक संकटात सापडला होता. त्याच्याकडे भाडे भरण्यासाठी पैसेही नव्हते, त्यामुळे मुंबई सोडून त्याला इंदूरला जावे लागले. नंतर पुन्हा इंडस्ट्रीत येण्यासाठी त्याला इंडस्ट्रीतील काही मित्रांचे सहकार्य लाभले.