आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
 • Marathi News
 • Entertainment
 • Tv
 • Bigg Boss 14 Contestant Fees: Rubina DilaIK Is The Highest Paid Contestant Of This Season, Toofani Senior Siddharth Shukla Get Rs. 32 Lakhs For Just 14 Days

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बिग बॉस 14 - कंटेस्टंट्स फीस:या सीझनमधील सर्वात महागडी स्पर्धक आहे रुबीना दिलैक, फक्त 14 दिवसांसाठी तुफानी सीनिअर सिद्धार्थ शुक्लाने घेतले तब्बल 32 लाख रुपये

7 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • दोन आठवडे घरात राहणा-या तुफानी सीनिअर्सला मिळाले लाखो रुपये

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त रिअॅलिटी शो म्हणून ओळखल्या जाणा-या बिग बॉसच्या यंदाच्या सीझनमध्ये रुबीना दिलैक सतत चर्चेत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या अभिनेत्रीला शोमध्ये येण्याची ऑफर दिली जात होती, मात्र तिने ती नाकारली. पण यंदाच्या पर्वात रुबीना तिचा पती अभिनव शुक्लासोबत सहभागी झाली आहे. खास गोष्ट म्हणजे दर आठवड्यासाठी रुबीना तब्बल पाच लाख रुपये मानधन घेत आहे. तर तिच्या नव-याला तिच्यापेक्षा अर्धे मानधन दिले जात आहे.

 • हे आहेत सर्वाधिक मानधन घेणारे टॉप 5 स्पर्धक

रुबीना दिलैक - रुबीना या पर्वात सर्वात महागडी स्पर्धक आहे. आपला रोखठोक वक्तव्यांमुळे ती चर्चेत आहे. या शोसाठी तिला दर आठवड्याला 5 लाख रुपये मिळत आहेत. अलीकडेच रुबीनाने सलमानने तिचा नवरा अभिनव शुक्लाचा अपमान केल्याचा आरोप करत हा शो सोडण्याचा आग्रह धरला होता. या शोमध्ये येण्यास अभिनव उत्सुक नव्हता. पण आपल्या शब्दावर तो या शोमध्ये सहभागी झाला, त्याचा असा अपमान करणे चुकीचे आहे, असे रुबीना म्हणाली होती.

जस्मिन भसीन - ‘दिल से दिल तक’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेल्या जस्मिन भसीनला दर आठवड्याला 3 लाख रुपये दिले जात आहेत. ती या पर्वातील सर्वाधिक मानधन घेणारी दुसरी अभिनेत्री आहे. इमोशनल होऊन गेम खेळत असलेल्या जस्मिनला सलमानकडून कौतुकाची थाप मिळत आहे.

सारा गुरपाल- पंजाबी गायक आणि अभिनेत्री सारा गुरपाल या शोची तिसरी महागजी स्पर्धक होती. अलीकडेच ती या शोमधून एलिमिनेट झाली. तिला दर आठवड्याला 2 लाख रुपये दिले जात होते, परंतु पहिल्या आठवड्यातच ती घराबाहेर पडली आहे. साराचे एविक्शन तुफानी सीनिअर्सच्या संमतीने करण्यात आले होते. त्यामुळे सारा नाराज झाली होती.

निशांत मलकानी - 'गुड्डन तुमसे ना हो पाएगा' फेम अभिनेता निशांतला दर आठवड्याला 2 लाख रुपये दिले जात आहेत. बिग बॉस 14 मध्ये सहभागी होण्यासाठी त्याने ही मालिका सोडली होती.

एजाज खान - चित्रपट आणि टीव्ही मालिकांमधील प्रसिद्ध अभिनेता एजाज खानला या कार्यक्रमासाठी दर आठवड्याला 1.8 लाख रुपये मिळत आहेत. पहिल्या आठवड्यात एजाज प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यात अपयशी ठरला होता. परंतू सलमानने समजूत घातल्यानंतर तो आता उघडपणे खेळ खेळत आहे.

 • शहजाद देओल या सीझनमधील सर्वात कमी मानधन घेणारा स्पर्धक

शोमधील या पाच सदस्यांव्यतिरिक्त, पवित्रा पुनिया आणि अभिनव शुक्ला यांना दर आठवड्याला दीड लाख रुपये, निक्की तांबोळीला 1.2 लाख रुपये, राहुल वैद्यला 1 लाख रुपये आणि जान कुमार सानूला 80 हजार रुपये मिळत आहेत. बुधवारी घराबाहेर पडलेला शहजाद देओल या सीझनमधील सर्वात कमी मानधन घेणारा स्पर्धक होता. त्याला दर आठवड्यासाठी 50 हजार रुपये फी मिळत होती.

दोन आठवडे घरात राहणा-या तुफानी सीनिअर्सला मिळाले लाखो रुपये

 • सिद्धार्थ शुक्ला - 32 लाख रुपये
 • हिना खान - 25 लाख रुपये
 • गौहर खान - 20 लाख रुपये
बातम्या आणखी आहेत...