आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कलर्स वाहिनीवर सुरू असलेला बिग बॉस हा कार्यक्रमाच्या इतिहासात पहिल्यांदाच टेलिव्हिजन क्वीन एकता कपूर बिग बॉसच्या घरात दिसणार आहे. लवकरच एकता आपल्या आगामी ‘बिच्छु का खेल’ या वेब सीरिजच्या प्रमोशनसाठी बिग बॉसमध्ये जाणार आहे. एकता कपूरसोबत अभिनेता दिव्येन्दू शर्मा आणि सुमित व्यास बिग बॉसच्या सेटवर दिसणार आहे.
पहिल्यांदाच बिग बॉसच्या घरात एकता कपूर आणि दिव्येंदू वेगळ्याच स्टाईलमध्ये दिसणार आहेत. यापूर्वीही एकता कपूर बिग बॉसमध्ये आली होती. परंतु आता ती बिग बॉसच्या घरात एंट्री घेणार आहे. दरम्यान, बिग बॉसचे स्पर्धकही यासाठी आतुर आहेत. शोशी संबंधित एका सूत्राने सांगितले, 'एकता घरातील स्पर्धकांना भेटण्यास उत्सुक आहे. सहसा सर्व स्पर्धक बिग बॉसचा आवाज किंवा एखादे गाणे ऐकून सकाळी उठतात. मात्र यावेळी वीकेंड का वारमध्ये ट्विट्स असेल. संगीताऐवजी सर्व स्पर्धक एकताचा आवाज ऐकून उठतील,
बिग बॉस 14 मध्ये असेल लीप
स्पेशल एपिसोडअंतर्गत एकता स्पर्धकांना काही टास्क देणार आहे. सूत्र सांगतात, 'एकता आपल्या मालिकांमध्ये लीपसाठी प्रसिद्ध आहे. तिच्या प्रत्येक मालिकेत काही वर्षांचा लीप असतो आणि तेथून कथेत ट्विस्ट येत असतो. असाच काहीसा नजारा बिग बॉसमध्येही बघायला मिळणार आहे. सोबतच ती शोचा होस्ट सलमानसोबत मिळून स्पर्धकांची फिरकीदेखील घेताना दिसणार आहे.'
झी 5 वर रिलीज झाली 'बिच्छू का खेल' ही वेब सीरिज
18 नोव्हेंबर रोजी अल्ट बालाजी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही वेब सीरिज प्रदर्शित करण्यात आली आहे. परंतु आता या सीरिजच्या प्रमोशनसाठी एकता कपूर सलमानच्या या शोमध्ये दिसणार आहे. या वेब सीरिजमध्ये दिव्येंदूव्यतिरिक्त अंशुल चौहान, झिशान काद्री, राजेश शर्मा, सत्यजित शर्मा, गगन आनंद आणि अभिनव आनंद हे दिसणार आहेत. या सीरिजचे एकुण नऊ एपिसोड प्रसारित होणार आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.