आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • Bigg Boss 14 Fame Jasmin Bhasin On What Helped Her Overcome Suicidal Thoughts, Said You Need To End That Battle With Yourself First

खुलासा:अनेकदा ऑडिशनमध्ये रिजेक्ट झाल्यानंतर जॅस्मिन भसीनच्या मनात आला होता आत्महत्येचा विचार, म्हणाली - स्वत:वरील प्रेमाने नकारात्मक विचार कमी झाले

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जाणून घ्या काय म्हणाली जॅस्मिन...

'बिग बॉस 14' ची स्पर्धक राहिलेल्या जॅस्मिन भसीनने शोमध्ये अनेकदा ऑडिशनमध्ये रिजेक्ट झाल्यानंतर आत्महत्येचा विचार आल्याचे सांगितले होते. आता अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत तिने याविषयी सांगितले आहे.

जॅस्मिनने सांगितले, 'आयुष्यात खूप वाईट काळ पाहिला. मला ऑडिशनमध्ये बऱ्याचदा नाकारले गेले तेव्हा आत्महत्या करण्याचा विचार आला होता. तो खूप वाईट काळ होता. जेव्हा मी मुंबईला आले आणि संघर्ष करत होते. मात्र हा स्वत:शीच लढा आहे कारण आपण कुठेतरी कमी पडतो आहोत, असे मी स्वत:ला समजवत होते. आपल्यात काही उणिवा असतील, म्हणून नकार मिळत असेल, असे मला वाटत होते.'

स्वत:वरील प्रेमाने नकारात्मक विचार कमी झाले
जॅस्मिनने पुढे सांगितले, ‘मी स्वत:वर प्रेम करुन लागल्याने नकारात्मक विचार दूर गेले. माझ्या मते, शिकण्यासाठी आधी स्वत:शी लढाई करावी लागेल. अापण जसे आहोत तसेच राहायला हवे. कुणाला पाहुन तसे करण्याच्या नादात पडलो की मग काहीच हाती येत नाही. त्यामुळे स्वत:ला उणीवासह स्वीकार करावा, मग त्यात सुधारणा करावी. मग यश आपलेच.'

'तेरा सूट' या म्युझिक व्हिडिओमध्ये झळकली जॅस्मिन
जॅस्मिन भसीनने आतापर्यंत 'टशन-ए-इश्क', 'दिल से दिल तक' आणि 'नागिन: भाग्य का जहरिला खेल' सारख्या टीव्ही शोमध्ये काम केले आहे. 'बिग बॉस 14' आणि 'खतरों के खिलाडी 9' सारख्या रिअ‍ॅलिटी शोमध्येही तिने भाग घेतला होता. 'बिग बॉस 14' नंतर जॅस्मिन तिच्या बॉयफ्रेंड अली गोनीसह टोनी कक्करच्या 'तेरा सूट' आणि 'तू भी सताया जाएगा' या दोन म्युझिक व्हिडिओमध्ये दिसली आहे.

बातम्या आणखी आहेत...