आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेत्रीने कोरोनामुळे गमावला भाऊ:'बिग बॉस' फेम निक्की तांबोळीचा भाऊ जतिनचे निधन, भावनिक पोस्ट शेअर करत म्हणाली - मिस यू दा...

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • निक्की तांबोळीच्या भावाला काही दिवसांपूर्वीच कोरोनाची लागण झाली होती.

कोरोनाच्या दुस-या लाटेने देशात आक्राळविक्राळ रुप घेतले आहे. दररोज कोरोनामुळे मृतांचा आकडा वाढतच चालला आहे. मनोरंजन क्षेत्रातही अनेकांचे निधन झाले आहे. आज सकाळीच अभिनेत्री पिया बाजपेयीच्या भावाच्या निधनाचे वृत्त आले. आता बिग बॉस 14 ची स्पर्धक निकी तांबोळी हिच्या भावाचे कोरोनामुळे निधन झाले असून याची माहिती निक्कीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून दिली आहे. या पोस्टमध्ये तिने आपल्या भावाच्या निधनाचे दुःख व्यक्त करत त्याच्यासाठी एक इमोशनल नोट लिहिली आहे. भावाच्या निधनाने निक्कीला मोठा धक्का बसला आहे.

निक्कीच्या पोस्टनुसार, तिचा भाऊ जतिनचे फक्त एक फुफ्फुस सक्रिय होते, मात्र नंतर तेदेखील टीबी आणि कोरोनाने संक्रमित झाले होते.

तो रुग्णालयांना कंटाळला होता - निक्की
निक्कीने लिहिले- 'माझा भाऊ अवघ्या 29 वर्षाचा होता. गेल्या काही वर्षांपासून तो बर्‍याच आजारांशी झुंज देत होता. त्याच्या फुफ्फुसांचे कार्य थांबल्यामुळे त्याला 20 दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तो फक्त एका फुफ्फुसावर जिवंत होता. त्याला रुग्णालयात टीबी आणि कोरोना संसर्ग देखील झाला होता. या व्यतिरिक्त त्याला निमोनिया देखील झाला होता. आणि आज सकाळी त्याच्या हृदयाचे ठोके देखील थांबले. देवाने त्याला बर्‍याच वेळा वाचवले. पण म्हणतात ना की, जे लिहिले आहे तेच होते. कोणीही नशिब बदलू शकत नाही. ज्यांनी माझ्या भावासाठी प्रार्थना केली त्या सर्वांची मी आभारी आहे तो रुग्णालयांना कंटाळला होता. आता तो एका चांगल्या जागी आणि चांगल्या हातात आहे. देव त्याची काळजी घेईल.' शेवटी तिने मिस यू दा... असे म्हटले आहे.

तीन दिवसांपूर्वीच निक्कीने आपला भाऊ ठीक व्हावा यासाठी पूजा ठेवली होती. याशिवाय सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांना तिच्या भावाच्या आरोग्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले होते.

निक्कीच्या या पोस्टवर चाहत्यांसह इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी तिचे आणि तिच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले आहे. बिग बॉस 14 मध्ये निक्कीसोबत दिसलेला स्पर्धक आणि अभिनेता अली गोनीने निक्कीच्या भावाच्या निधनानंतर दुःख व्यक्त केले आहे. 'निक्कीच्या भावाच्या निधनाची बातमी ऐकली. देव त्याच्या आत्म्यास शांती देवो. निक्की तू खंबीर राहा' असे त्याने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले आहे.

बातम्या आणखी आहेत...