आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • Bigg Boss 14 Finale: The Show Will Have Its Finale In A Week Instead Of January, Only 4 Members Out Of 9 Will Go On The Show

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बिग बॉस 14 मध्ये मोठा ट्विस्ट:जानेवारीत नव्हे पुढच्या आठवड्यात होणार महा अंतिम सोहळा, 9 पैकी फक्त 4 स्पर्धक जातील पुढे

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या सीझनचा महा अंतिम सोहळा जानेवारी ऐवजी पुढच्या आठवड्यात होणार असल्याचे वृत्त आहे.

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त रिअ‍ॅलिटी शो म्हणून ओळखला जाणारा बिग बॉसचे 14 वे पर्व 3 ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला आले. प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी यात बरेच ट्विस्ट अँड टर्न्स आणले जात आहेत. जुन्या स्पर्धकाची नवीन वाइल्ड कार्ड सदस्य म्हणून घरात एंट्री झाल्यानंतर आता सलमान खानने शोच्या महा अंतिम सोहळ्याविषयी एक घोषणा केली आहे. जे ऐकून घरातील सर्व स्पर्धकांना मोठा धक्का बसला आहे. या सीझनचा महा अंतिम सोहळा जानेवारी ऐवजी पुढच्या आठवड्यात होणार असल्याचे वृत्त आहे.

नुकताच रिअ‍ॅलिटी शोचा नवीन प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. शोच्या प्रोमोमध्ये सलमान खान घरातील सदस्यांना विचारतो की, बिग बॉसची फिनाले कधी होणार आहे हे तुम्हाला माहिती आहे का? त्यावेळी निक्की तंबोली म्हणते की, जानेवारी 2021 यावर सलमान खान म्हणतो ‘बिग बॉस 14’चा फिनाले पुढील वर्षी होणार नाही तर, पुढच्या आठवड्यात होणार आहे. केवळ 4 स्पर्धक या अंतिम फेरीत जाणार आहेत.

5 सदस्य एकत्र बेघर होतील
सलमानने सांगितल्यानुसार, पुढील आठवड्यात केवळ 4 सदस्य फिनालेमध्ये सहभागी होऊ शकतील आणि उर्वरित सदस्यांना शोमधून बाहेर काढले जाईल. हे ऐकून सर्व सदस्य हैराण होतात. खरं तर मागील सीझनमध्ये हा शो एक महिन्यासाठी वाढविण्यात आला होता, परंतु यंदा एवढ्या लवकर शोचा अंतिम सोहळा होणार असल्याने प्रेक्षक देखील आश्चर्यचकित झाले आहेत.

बिग बॉसच्या घरात सध्या रुबीना दिलैक, कविता कौशिक, एजाज खान, राहुल वैद्य, निक्की तंबोली, जास्मीन भसीन, अली गोनी, अभिनव शुक्ला आणि पवित्र पुनिया हे 9 सदस्य आहेत. तर, यापैकी निक्की तंबोली आणि एजाज खान सुरक्षित आहेत. तर इतर सर्व सदस्य या आठवड्यात नॉमिनेट आहेत.

आता खरोखरच पुढच्या आठवड्यात ‘बिग बॉस 14’चे पर्व संपणार की, सलमान खानने केवळ गुगली टाकली आहे का? हे बघणे इंट्रेस्टिंग ठरणार आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser