आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बिग बॉस 14:रागात सलमान खानने स्वतः स्वच्छ केला राखी सावंतचा बेड,  म्हणाला -  कोणतेही काम छोटे नसते

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सध्या भाईजानचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय असलेल्या ‘बिग बॉस’च्या विकेण्ड का वार एपिसोड्समध्ये प्रेक्षकांना अनेक ट्विस्ट बघायला मिळतात. सोबतच सलमानच्या रागाला सामोरे जाणारे स्पर्धक, स्पर्धकांच्या चुका हेदेखील या भागांमध्ये बघायला मिळते. सध्या बिग बॉसचे 14 वे पर्व चर्चेत आहे. शोमधील स्पर्धक निक्की तांबोळी आणि राखी सावंत यांच्यामधील वाद हे सुरुच असतात. पण विकेण्डच्या वारध्ये असे काही झाले घडले की खुद्द सलमान बिग बॉसच्या घरात साफसफाई करण्यासाठी पोहोचला आहे.

निक्की तांबोळीवर चिडला सलमान

नुकताच कलर्स वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर आगामी भागाचा प्रोमो शेअर केला आहे. या भागामध्ये सलमान खान निक्की तांबोळीला बेडरुममधील राखी सावंतच्या बेडची साफसफाई का केली नाही? असा प्रश्न विचारताना दिसतो. त्यावर निक्की तिला राखीच्या बेडची साफसफाई करायची नसल्याचे म्हणते. निक्कीचे उत्तर ऐकून सलमानला राग येतो आणि तो मी बिग बॉसच्या घरात येऊन राखीचा बेड स्वच्छ करताना दिसतोय. दरम्यान त्याने कोणतेही काम छोटे नाही असे म्हटले आहे. सध्या भाईजानचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून अनेकांनी कमेंट करत सलमानचे कौतुक केले आहे.

21 फेब्रुवारी रोजी होणार फिनाले
सूत्रांच्या माहितीनुसार, 21 फेब्रुवारी 2021 रोजी या शोचा अंतिम भाग असेल. शोमध्ये एन्ट्री घेण्यापूर्वी स्पर्धकांनाही हीच तारीख सांगितले गेली होती. शिवाय या शोच्या एक्सटेंशनचाही उल्लेख केला गेला होता. परंतु आता अशी कोणतीही योजना नाही. येत्या आठवड्यात हा शो अधिक मनोरंजक बनवण्यासाठी निर्माते आणखी काही वाइल्ड कार्ड एंट्रीची योजना आखत आहेत.

बातम्या आणखी आहेत...