आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • Bigg Boss 14: Karni Sena Accused Bigg Boss 14 Show For Promoting Love Jihad And Vugarity And Demand For Ban After Eijaz Khan And Pavitra Punia Kiss

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वादात बिग बॉस 14:पवित्र आणि एजाजच्या किसिंग सीनवर वाद, लव्ह जिहादला प्रोत्साहन दिल्याचा आरोप करत करणी सेनेची शो बंद करण्याची मागणी

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या सीझनमध्ये आता आणखी एक वाद रंगला आहे.

'बिग बॉस 14' हा टेलिव्हिजनवरील वादग्रस्त रिअॅलिटी शो सध्या चर्चेत आहे. या सीझनमध्ये आता आणखी एक वाद रंगला आहे. शोमध्ये गेल्या काही दिवसांपासून एजाज खान आणि पवित्र पुनिया यांचा लव्ह अँगल दाखवला जातोय. अनेकदा हे दोघे एकमेकांना अलिंगन देताना आणि किस करताना दिसले आहेत. त्यामुळे शोच्या अडचणीत वाढ होतेय. दोघांचा किसींग सीन दाखवल्यानंतर करणी सेनेने या शोवर लव्ह जिहादला प्रोत्यासहन दिल्याचा आरोप करत शोवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

करणी सेनेने शो मेकर्स आणि होस्ट सलमान खानवर अडल्ट कन्टेट आणि लव्ह जिहादला प्रोत्साहन दिल्याचा आरोप केला आहे. 'बिग बॉस'शी संबंधित माहिती देणाऱ्या ' द खबरी' या इन्स्टाग्राम अकाउंटवर करणी सेनेचे निवेदन शेअर करण्यात आले आहे.

यात राजपूत करणी सेनेने लिहिले आहे की, 'एका भागात पवित्र पुनियाच्या गालावर एजाज खानने किस केले. किसिंगचा हा प्रोमो ट्रेण्ड करत होता. कलर्स टीव्हीनेही त्याचे प्रमोशन केले होते. हा शो अश्‍लीलतेला उत्तेजन देणारा आणि देशाच्या सामाजिक मूल्यांशी खेळणारा शो आहे असा आमचा विश्वास आहे. हा कार्यक्रम देशाच्या सांस्कृतिक मूल्यांच्या विरोधात आहे. यात अनेक आक्षेपार्ह दृष्यही दाखवण्यात येत आहेत. 'बिग बॉस 14' लव्ह जिहादचा प्रचार आणि प्रसार करत आहे, हे अस्वीकार्य आहे. म्हणूनच आम्ही कलर्स टीव्हीच्या 'बिग बॉस' शो वर बंदी घालण्याची मागणी करत आहोत'', असे या नोटिसमध्ये नमूद करण्यात आले आहे. ही नोटिस राजपूत करणी सेनेचे उपाध्यक्ष दिलीप राजपूत यांनी पाठवली आहे.

जान सानूमुळे वादात होता हा शो
एजाज खान आणि पवित्र पुनिया यांच्यापूर्वी कुमार सानू यांचा मुलगा जान कुमार सानू याने मराठी भाषेबद्दल एक वादग्रस्त विधान केले होते. या विधानानंतर शिवसेना आणि मनसेने 'बिग बॉस'चं चित्रीकरण थांबवण्याची धमकीही दिली होती. जानने या प्रकरणात क्षमा मागितल्यानंतर हे प्रकरण मिटले होते. याप्रकरणी जानचे वडील कुमार सानू यांनाही माफी मागावी लागली होती.

बातम्या आणखी आहेत...