आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अभिनेत्री गहना वशिष्ठ 'बिग बॉस' या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झालेल्या प्रसिद्ध सेलिब्रिटींचे वैयक्तिक आयुष्य माहित असल्याचा दावा करत असते. आता तिने राहुल महाजनच्या वैवाहिक जीवनाविषयी मोठा खुलासा केला आहे. राहुलने तीन नव्हे तर चार वेळा लग्न केले असल्याचा दावा गहनाने केला आहे.
राहुलचे तीनदा नव्हे तर चार वेळा झाले लग्न
राहुल महाजनने तीन नव्हे तर चार वेळा लग्न केले असल्याचा आरोप गहना वशिष्ठने केला आहे. तिने सांगितल्यानुसार, राहुलने मुंबईतील मॉडेल भाविशा देसाईसोबत एका मंदिरात सिक्रेट लग्न केले होते. भाविशा मुळची गोव्याची आहे. पण गेली 15-18 वर्षे ती मुंबईत कार्यरत आहे. दाव्यानुसार, भाविशा देसाईने आरोप लावला होता की, राहुलने लग्नाच्या काही महिन्यांतच तिला सोडले आणि आता तो तिच्या संपर्कात नाही.
'बिग बॉस 14' मध्ये चॅलेंजर म्हणून झाली राहुलची एन्ट्री
राहुलने रविवारी रात्री चॅलेंजर म्हणून 'बिग बॉस 14' मध्ये प्रवेश केला आहे. त्याच्याव्यतिरिक्त बिग बॉसचे माजी स्पर्धक कश्मिरा शाह, राखी सावंत, विकास गुप्ता, मनु पंजाबी आणि अर्शी खान यांनीही
शनिवार व रविवारच्या भागात शोमध्ये एंट्री घेतली. मीडिया रिपोर्टनुसार, प्रमोद महाजन यांचा मुलगा राहुलने कझाकिस्तानची 25 वर्षीय मॉडेल नताल्या इलिनासोबत लग्न केले आहे. राहुलसोबत लग्नानंतर नताल्यांने हिंदू धर्म स्वीकारला आहे. श्वेता सिंह आणि डिंपी गांगुलीपासून घटस्फोट घेतल्यानंतर 43 वर्षीय राहुलने तिसरे लग्न केले.
पुर्वाश्रमीच्या पत्नींनी लावला होता घरगुती हिंसाचाराचा आरोप
घरगुती हिंसाचाराच्या आरोपांमुळे राहुल महाजनचे दोन लग्न टिकले नाहीत. त्याची पहिली पत्नी श्वेता ही त्याची बालपणीची मैत्रीण होती. हे दोघे 13 वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. श्वेताने राहुलवर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता. दोघे डिसेंबर 2007 मध्ये विभक्त झाले. त्यानंतर या दोघांचा 2008 मध्ये घटस्फोट झाला. यानंतर, 2010 मध्ये राहुल महाजनने डिंपी गांगुलीशी 'राहुल दुल्हनिया ले जाएगा' या रिअॅलिटी शोमध्ये लग्न केले. दोघांचे लग्न चार वर्षे टिकले. 2014 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला होता. डिंपीने देखील राहुलवर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.