आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तिस-या लग्नाची गोष्ट:तिसरी पत्नी नतालिया इलिनाविषयी राहुल महाजनचा खुलासा, म्हणाला -  'माझ्या पत्नीने धर्मपरिवर्तन केलंय'

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ‘माझ्या पत्नीने धर्मपरिवर्तन केले आहे’, असे वक्तव्य राहुलने बिग बॉस या शोमध्ये केले आहे.

बिग बॉसमधील सर्वात वादग्रस्त स्पर्धकांपैकी एक असलेला राहुल महाजन या शोमध्ये चॅलेंजर म्हणून सहभागी झाला आहे. खरं तर बिग बॉसच्या घरातच नव्हे तर राहुलच्या खासगी आयुष्यालाही वादाची किनार आहे. त्याची पहिली पत्नी श्वेता सिंग आणि दुसरी पत्नी डिंपी गांगुली यांनी त्याच्यावर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता. यापूर्वी तो ड्रग्जच्या प्रकरणातही अडकला होता. आता राहुलने तिसरे लग्न केले असून तो अध्यात्माच्या मार्गावर आहे. त्याची तिसरी पत्नी नतालिया इलिना ही रशियन आहे. नतालिया ही कझािकस्तानमधील आहे.

आम्ही आमच्या नात्यात समतोल राखला आहे.
ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीत आपल्या तिस-या लग्नाविषयी राहुल सांगतो, 'आम्ही दोघेही रेल्वेच्या दोन रुळाप्रमाणे आहोत. आम्ही कधीच एकमेकांच्या कामात हस्तक्षेप करत नाही. नात्यातील समपोल राखण्यासाठी आम्ही एकमेकांना स्वत:ची स्पेस दिली आहे', असे राहुलने सांगितले.

पत्नीला शिव-पार्वतीचे उदाहरण देतो - राहुल
राहुल पुढे सांगतो, 'माझी पत्नी रशियन असून तिने हिंदू धर्माचा स्वीकार केला आहे. आम्ही दोघेही अध्यात्माच्या मार्गावर आहोत. तसेच मी कायम तिला शिव-पार्वतीचे उदाहण देतो. आपले नाते हे शिव-पार्वतीप्रमाणे असावे असे मी कायम तिला सांगतो. मी तिला भगवद्गगीता शिकवतो. आम्ही अनेक आध्यात्मिक पुस्तकं एकत्र वाचतो.'

घरात महिलांपासून राहणार दूर
राहुलने बिग बॉसच्या घरात जाण्यापूर्वी सांगितले की, मी नतालियासोबत आनंदी वैवाहिक आयुष्य जगत आहे. त्यामुळे घरात महिलांपासून दूर राहणार. तो म्हणतो, यापूर्वी माझे घरात लिंकअप झआले होते आणि आता मात्र घरात कोणत्याही फेक फ्रेंडशिपमध्ये राहण्याची माझी इच्छा नाही.

असे आहे राहुलचे वैवाहिक आयुष्य
राहुलचे पहिले लग्न त्याची बालमैत्रीण श्वेता सिंहसोबत झाले होते. 2006 मध्ये दोघांनी लग्न केले होते. त्याचे दुसरे लग्न 2010 मध्ये डिंपी गांगुलीसोबत झाले होते. 2014 पर्यंत हे लग्न टिकले आणि त्यानंतर दोघांनी घटस्फोट घेतला. राहुलची तिसरी पत्नी नतालिया ही राहुलपेक्षा 18 वर्षांनी लहान आहे. दोघांचे लग्न 20 नोव्हेंबर 2018 रोजी झाले.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser