आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
गायक राहुल वैद्यने बिग बॉसच्या यंदाच्या सीझनमध्ये प्रवेश केला आहे. राहुल वैद्यचा गेम प्रेक्षकांसह सलमानलादेखील आवडत आहे. दरम्यान, राहुल लवकरच या शोमध्ये आपल्या प्रेमाची कबुली देणार आहे. तो गेल्या 2 वर्षांपासून टीव्ही अभिनेत्री दिशा परमारला डेट करत आहे. दोघेही आपले रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात, त्यानंतर राहुल आता बिग बॉसमध्ये दिशाला प्रपोज करणार आहे.
दिशा परमार ही अभिनेत्री असून प्यार का दर्द है मीठा-मीठा या मालिकेत झळकली होती. सोशल मीडियावर हे दोघेही रोमँटिक छायाचित्रे शेअर करत असतात, मात्र अद्याप त्यांनी सार्वजनिकरित्या आपल्या प्रेमाची कबुली दिलेली नाही. इतकेच नाही तर बिग बॉस 14 मध्ये एन्ट्री घेण्यापूर्वी एका मुलाखतीत राहुलने ही बातमी अफवा असल्याचे सांगून दिशा केवळ चांगली मैत्रीण असल्याचे म्हटले होते.
दिशाच्या 28 व्या वाढदिवशी करणार प्रपोज 11 नोव्हेंबरला दिशा परमार आपला 28 वा वाढदिवस साजरा करत आहे. या निमित्ताने राहुल आपल्या लेडी लव्हला गुडघ्यावर बसून प्रपोज करताना या शोमध्ये दिसणार आहे. व्हाईट टी-शर्टवर राहुलने दिशा परमारचे नाव लिहिले आहे. ''माझ्यासाठी आजचा दिवस खूप खास आहे. माझ्या आयुष्यात एक मुलगी असून तिचे नाव दिशा परमार आहे. मला तिला विचारायला बरेच का लागले ठाऊक नाही... तू माझ्याशी लग्न करशील का?'', असे म्हणत राहुल दिशाला लग्नाची मागणी घालताना बिग बॉसच्या घरात दिसणार आहे. लग्नाचा प्रस्ताव दिल्यानंतर मी तुझ्या उत्तराची प्रतीक्षा करेन, असेही राहुलने म्हटले आहे. चॅनेलने या भागाचा प्रोमोदेखील प्रसिद्ध केला आहे. दिशा परमार बिग बॉस 7 मध्ये पाहुणी म्हणून सहभागी झाली होती.
View this post on InstagramA post shared by Colors TV (@colorstv) on Nov 10, 2020 at 10:40am PST
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.