आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
'बिग बॉस 14' या रिअॅलिटी शोमध्ये 'शक्ती अस्तित्व के एहसास' की फेम रुबीना दिलैक आणि तिचा नवरा अभिनव शुक्ला यांनी सहभाग घेतला आहे. या दोघांमुळे हा शो चर्चेत आहे. आता शोदरम्यान रुबिनाने तिच्या आणि अभिनवच्या नात्याविषयी एक धक्कादायक खुलासा केला आहे. राहिली आहे, परंतु यादरम्यान, रुबीनाने एका टास्क दरम्यान उघड केले की, यावर्षी दोघांचे घटस्फोट होणार होते, यासाठी त्यांनी नोव्हेंबरपर्यंत एकमेकांना वेळ दिला होता.
या आठवड्यात बिग बॉस 14 चा फिनाले होणार असून यात केवळ 4 सदस्य पुढे जातील. अशा परिस्थितीत प्रत्येक सदस्य घरात टिकून राहण्याचा प्रयत्न करत आहे. अलीकडेच बिग बॉसने या सर्व स्पर्धकांना एख टास्क दिला, ज्यामध्ये त्यांना त्यांच्या आयुष्याशी संबंधित मोठे गुपित उघड करायला सांगितलेआहे. यामध्येच रुबिना आणि अभिनवने बिग बॉसमध्ये येण्याचे कारण सांगितले. त्याचबरोबर ते घटस्फोट घेणार असल्याचेही सांगितले.
यावेळी बोलताना रुबिना अतिशय भावूक झालेली दिली. “एक वेळ अशी आली होती, जेव्हा मला अभिनवपासून घटस्फोट हवा होता. त्यामुळे आम्हाला नोव्हेंबरपर्यंत विचार करण्याचा कालावधी देण्यात आला होता. याचदरम्यान आम्हाला बिग बॉस 14 ची ऑफर आली. या शोच्या निमित्ताने आम्हाला एकमेकांसोबत वेळ घालवता येईल यासाठीच आम्ही या शोची ऑफर स्वीकारली”, असे रुबिनाने सांगितले. विशेष म्हणजे रुबिनाला रडताना पाहून अभिनवचे डोळेदेखील पाणावले.
सीक्रेट उघड केल्याने नाराज झाला अभिनव
रुबिनाच्या या मोठ्या कबुली नंतर जेव्हा ती बाहेर आली तेव्हा अभिनवने तिच्या निर्णयाचा विरोध दर्शवला. अभिनव म्हणाला की, आता ही बातमी सर्वत्र पसरेल. हे आपले सीक्रेट होते, जे आता जगाला माहित झाहे आहे. रुबिनाआधी सलमान खानने ग्रँड प्रीमिअरच्या वेळी दोघांमध्ये बिनसले असल्याचा उल्लेख केला होता.
रुबिना आणि अभिनव यांनी 2018 मध्ये लग्न केले होते. पण गेल्या काही महिन्यांपासून दोघांमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याची चर्चा सुरु होती. त्यामुळे त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला होता. मात्र या शोदरम्यान दोघांमधील वाद संपुष्टात आल्याचेही म्हटले जात आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.