आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • 'Bigg Boss 14' Runner Up Rahul Vaidya Said Mother Was Sitting In Front Of Me Hoping For My Win, She Was Very Sorry For My Defeat; Sad To See Them

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इंटरव्ह्यू:'बिग बॉस 14' चा रनरअप राहुल वैद्य म्हणाला - आई माझ्यासमोर विजयच्या आशेने बसली होती, माझ्या पराभवामुळे तिची निराशा झाली; तिला पाहून खूप वाईट वाटले

12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • माझ्या आईसाठी थोडे वाईट वाटले

गायक राहुल वैद्य हा 'बिग बॉस 14' चा फर्स्ट रनरअप ठरला. शोच्या अंतिम टप्प्यात त्याचा सामना रूबीना दिलैकसोबत झाला. मात्र राहुलला मागे टाकत रुबीना या शोची विजेती ठरली. दिव्य मराठीसोबतच्या खास संभाषणात राहुलने सांगितले की, त्याच्या पराभवामुळे त्याची आई आणि गर्लफ्रेंड दिशा परमार खूप निराश झाल्या आहेत. पण सोबतच त्याच्यासाठी यशअपयश हा शोचा एक भाग आहे. तसेच राहुलने शोशी संबंधित बर्‍याच गोष्टी शेअर केल्या आहेत.

माझ्या आईसाठी थोडे वाईट वाटले
जेव्हा होस्ट सलमान खानने रुबीना असे नाव घेतले तेव्हा मी तिच्यासाठी आनंदी होतो. मात्र, माझ्या आईसाठी थोडे वाईट वाटले. माझ्या विजयाच्या आशेने ती माझ्या समोर बसली होती आणि मला असे वाटते की माझ्यापेक्षा जास्त वाईट तिला वाटले. मला रिअॅलिटी शोची सवय आहे, यात कुणाच्या पदरी यश तर कुणाच्या पदरी अपयश येतं असतं. आईसोबत मला माझ्या चाहत्यांसाठी देखील वाईट वाटत आहेस त्यांना माझ्या विजयाशी आशा होती.

माझ्या पराभवामुळे दिशा देखील थोडी निराश झाली होती
माझ्या पराभवामुळे दिशा देखील थोडी निराश झाली होती. तिचेही डोळे पाणावले होते. मला आश्चर्य वाटतंय की, माझ्या पराभवानंतरही मी ठीक आहे, पण याचा परिणाम माझ्या कुटुंबीयांवर झाला आहे. त्यांना असे निराश बघून मला खूप वाईट वाटतंय

हा शो माझ्यासाठी 'लाइफ चेंजर' असल्याचे सिद्ध झाले
'बिग बॉस' ने मला एक वेगळी ओळख दिली आहे. मला समाधान आहे की, या शोमध्ये सहभागी होण्याचा मी निर्णय घेतला. या संपूर्ण प्रवासात खूप काही शिकलो आहे. हा शो माझ्यासाठी 'लाइफ चेंजर' ठरला, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

आता रुबीनासोबत कोणतेही मतभेद राहिले नाहीत
यावेळी राहुलला रुबीना आणि त्याच्या नात्याबद्दल विचारण्यात आले त्यावेळी राहुल म्हणाला की, बिग बॉसच्या घरात आमच्या दोघांचे भांडणे नेमके कुठून सुरू झाले हेच मुळात आम्हाला दोघांनाही माहिती नाही. परंतू आमच्यामध्ये असलेले वादविवाद आम्ही दोघेही बिग बॉसच्या घरामध्ये सोडून आलो आहोत. आमच्या दोघांमध्ये कुठलेही मतभेद आता राहिलेले नाहीत. आता जेव्हाही मी रुबीना भेटेल, तिच्यासाठी चांगलेच वागेल.

बातम्या आणखी आहेत...