आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • Bigg Boss 14 Update: After Swami Om, Now Radhe Ma, Who Lives A Controversial Life, Will Enter In Big Boss 14

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बिग बॉस 14 अपडेट:स्वामी ओमनंतर आता वादग्रस्त आयुष्य जगणारी राधे मां घेणार बिग बॉसच्या घरात एंट्री, गेल्या अनेक वर्षांपासून मिळत होती शोची ऑफर

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चॅनेल किंवा निर्मात्यांनी अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिअॅलिटी शो बिग बॉस 14 चा प्रोमो समोर येताच यंदाच्या पर्वात घरात बंदिस्त होणा-या अनेक सेलिब्रिटींची नावे पुढे येत आहेत. यावर्षी, 14 सेलिब्रिटी आणि 3 कॉमनर्स बिग बॉसच्या घरात प्रवेश करणार आहेत. यंदाच्या पर्वात वादग्रस्त आयुष्य जगणारी राधे मां स्पर्धकाच्या रुपात या कार्यक्रमात दिसणार आहे. याबद्दल चॅनेल किंवा निर्मात्यांनी अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

टेलीचक्करच्या वृत्तानुसार, स्वत:ला देवीचा अवतार असल्याचे सांगणारी सुखविंदर कौर उर्फ राधे मां यंदाच्या पर्वात सहभागी होणार आहे. सुखविंदरला राधे मांच्या नावाने बरीच प्रसिद्धी मिळाली आहे. गेल्या अनेक सीझनसाठी तिच्याशी संपर्क साधला जात होता, पण यावर्षी तिने ही ऑफर स्वीकारली आहे.

गुरदासपूर जिल्ह्यात जन्मलेली सुखविंदर कौर लहानपणीच भक्तीच्या मार्गावर निघाली. विचित्र ड्रेसिंग सेन्स, बोलण्याची पद्धत आणि लोकांच्या अडचणी दूर करण्याचा दावा करणारी राधे मां अनेक कारणांमुळे वादात सापडली आहे. वादग्रस्त वक्तव्ये आणि लोकांना आय लव्ह यू फ्रॉम बॉटम ऑफ माय हार्ट म्हणून सुखविंदर सोशल मीडियावर चर्चेत राहिली.

  • डॉली बिंद्राने लावला होता लैंगिक छळाचा आरोप

बिग बॉस 4 मध्ये दिसलेली डॉली बिंद्रा राधे मांची भक्त होती. मात्र 2015 मध्ये डॉली बिंद्राने राधे मां आणि तिच्या काही भक्तांवर लैंगिक छळाचा आरोप लावला होता. चंदीगडस्थित एका मोठ्या पोलिस अधिका-या घरी नेऊन लैंगिक छळ केल्याचा आरोप डॉलीने त्यांच्यावर लावला होता. याप्रकरणी डॉलीने पोलिसात तक्रार दाखल केली होती आणि तिच्याशी असलेले नाते तोडले होते.

राधे मां व्यतिरिक्त यंदाच्या पर्वात टीव्ही अभिनेत्री जस्मीन भसीन, निया शर्मा आणि नैना सिंह दिसणार आहेत. याशिवाय अनु मलिक आणि आमिर अली यांची नावेदेखील या समोर आली आहेत. शोच्या सेटची दुरुस्ती सुरू आहे, ती पूर्ण झाल्यावर 4 ऑक्टोबरला या कार्यक्रमाचा भव्य प्रीमियर असेल.