आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • 'Bigg Boss 14' Will Put A Lockdown Connection, Makers Are Also Discussing Sending Phones And Gadgets With Contestants

टीव्ही अपडेट:'बिग बॉस 14'मध्ये प्रेक्षकांना दिसू शकेल लॉकडाऊन कनेक्शन, स्पर्धकांना फोन आणि गॅझेटसह मिळणार घरात एंट्री! 

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या शोचे नाव 'बिग बॉस 14 लॉकडाऊन एडिशन' असणार असल्याचे वृत्त आहे.

'बिग बॉस 13' च्या लोकप्रियतेनंतर चाहते पुढच्या सीझनची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता निर्मात्यांनी त्याच्या पुढच्या पर्वाची तयारी सुरू केली आहे. यावर्षी शोमध्ये लॉकडाऊन कनेक्शन प्रेक्षकांना बघायला मिळू शकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पिंकविलाच्या  रिपोर्टनुसार, बिग बॉस या लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शोच्या पुढील सीझनमध्ये प्रेक्षकांना मोठा बदल पाहायला मिळणार आहे. देशाची सद्यस्थिती लक्षात घेता निर्मात्यांनी 'बिग बॉस 14' मध्ये लॉकडाऊनचा तडका लावण्याची योजना आखली आहे. या शोचे नाव 'बिग बॉस 14 लॉकडाऊन एडिशन' असणार असल्याचेही वृत्त आहे. मागील सीझनचा प्रीमियर 29 सप्टेंबर रोजी झाला होता, परंतु यावर्षी हा शो उशिरा येण्याची शक्यता आहे.

  • बिग बॉसच्या घरात स्पर्धकांजवळ असेल सेल फोन  

शोच्या मागील सर्व सीझनमध्ये शोच्या स्पर्धकांना बाह्य जगाशी कोणताही संबंध ठेवण्याची परवानगी नव्हती. मात्र आता बातमी आहे की, यंदाच्या पर्वात स्पर्धक बाहेरील जगाशी संपर्कात राहू शकतील. स्पर्धक फोन घेऊन घरात प्रवेश करू शकतात आणि चाहत्यांना त्यांचे व्लॉग आणि व्हिडिओ पाठवू शकतात. परंतु या फॉर्मेटवर सध्या चर्चा सुरु आहे.

  • या सेलिब्रिटींना शोची ऑफर देण्यात आली

भाबीजी घर पर हैं मध्ये महत्त्वाची भूमिका साकारणारी अभिनेत्री शुभांगी अत्रेला या कार्यक्रमाचा भाग होण्यासाठी संपर्क साधण्यात आला होता, पण कामात व्यस्त असल्यामुळे तिने ही ऑफर नाकारली. तर दुसरीकडे अभिनेत्री चाहत खन्नालाही ऑफर देण्यात आली होती, पण तिनेही या कार्यक्रमात रस दाखवला नाही. चाहत म्हणाली की अशा शोमध्ये तिची रुची नाही. 

  • या लोकांनी मागील सीझन केला हिट 

रश्मी देसाई, सिद्धार्थ शुक्ला, पारस छाबडा, शहनाज गिल आणि माहिरा शर्मा या सेलिब्रिटींनी  बिग बॉस 13 हा शो गाजवला होता.  विजेता ठरलेल्या सिद्धार्थ शुक्लासह असीम रियाजनेही या कार्यक्रमातून बरीच प्रसिद्धी मिळवली होती. दोघांच्या भांडणाने शोला चांगला टीआरपी मिळाला होता. मागील सीझनमधील हाय व्होल्टेज ड्रामामुळे अनेक विक्रम मोडले गेले होते.