आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
'बिग बॉस 14' साठी टॅलेंट मॅनेजर म्हणून काम करणारी पिस्ता धाकड हिचे एका अपघातात निधन झाले आहे. शुक्रवारी संध्याकाळी ही घटना घडली. सलमान खानसह 'वीकेंड का वार' या एपिसोडचे चित्रीकरण पूर्ण केल्यानंतर पिस्ता तिच्या एका मैत्रिणीसह अॅक्टिव्हावरून घरी जात होती. सेटवरुन बाहेर येताच त्यांची गाडी घसली, आणि मागून येणारी एक व्हॅनिटी व्हॅन पिस्ताच्या अंगावरुन गेली.
रस्त्यावर अंधार असल्यामुळे हा अपघात झाला
स्पॉटबॉयने शोशी संबंधित सूत्रांच्या हवाल्याने लिहिले की, रस्त्यावर अंधार असल्यामुळे हा अपघात घडला. पिस्ताची अॅक्टिव्हा गाडी एका खड्ड्यात पडली आणि दोघीही गाडीवरुन खाली पडल्या. दुसरी मुलगी उजवीकडे पडली, तर पिस्ता डावीकडे पडली. त्याचवेळी त्यांच्या मागून येणारी व्हॅनिटी व्हॅन पिस्ताच्या अंगावरुन गेली. हा अपघात एवढा भीषण होता की घटनास्थळीच पिस्ताचा मृत्यू झाला.
पिस्ताच्या अकस्मात मृत्यूमुळे सर्वांना धक्का बसला
एंडेमोल इंडिया या प्रसिद्ध प्रॉडक्शन हाऊसची कर्मचारी राहिलेल्या पिस्ताने 'द वॉइस', 'बिग बॉस' आणि 'खतरों के खिलाडी' यासह अनेक शोसाठी काम केले होते. अभिनेता-अभिनेत्रीपासून ते इतर कर्मचार्यांपर्यंत प्रत्येकाशी तिचे चांगले संबंध होते. तिच्या अकस्मात मृत्यूने सर्वांना मोठा धक्का बसला आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.