आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • Bigg Boss 15: Just A Day Before The Start Of The Show, Jai Bhanushali Signed The Big Boss Show, The Promo Released By The Channel

बिग बॉस 15:शो सुरू होण्याच्या अवघ्या एक दिवस आधी जय भानुशालीने साइन केला शो, वाहिनीने प्रसिद्ध केला प्रोमो

19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वाहिनीने प्रसिद्ध केलेल्या प्रोमोमध्ये झळकला जय

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो बिग बॉसचे 15 वे पर्व लवकरच कलर्स वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. शोचा ग्रँड प्रीमियर 2 ऑक्टोबर रोजी होणार आहे. शोमध्ये सहभागी होणा-या स्पर्धकांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. ताज्या वृत्तानुसार, शेवटच्या क्षणी आता एका लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याची वर्णी या शोमध्ये लागली आहे. अभिनेता जय भानुशाली स्पर्धक म्हणून शोमध्ये सहभागी होत आहे.

ई-टाइम्सने बिग बॉस 15 च्या जवळच्या सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, "कलर्स वाहिनी शोसाठी काही लोकप्रिय टीव्ही कलाकारांचा शोधात होती, आणि शो सुरु होण्याच्या एक दिवस आधी स्पर्धक म्हणून जय भानुशालीसोबत करार झाला आहे.'

वाहिनीने प्रसिद्ध केलेल्या प्रोमोमध्ये झळकला जय
कलर्स वाहिनी मागील काही दिवसांपासून बिग बॉस 15 चे प्रोमो रिलीज करत आहे. यातील एका प्रोमोत आता अभिनेता जय भानुशालीची झलक पाहायला मिळत आहे. याशिवाय करण कुंद्रा, अफसाना खान, तेजस्विनी प्रकाश, आकासा सिंग, उमर रियाज, डोनाल बिष्ट यांचे चेहरेही प्रोमोमध्ये दाखवण्यात आले आहेत.

कयामत, क्योंकी सास भी कभी बहू थी आणि कैरी सारख्या गाजलेल्या टीव्ही मालिकांमध्ये झळकलेल्या जय भानुशालीने सुपर डान्सर, सुपरस्टार सिंगर, इंडियन आयडॉल आणि डान्स इंडिया डान्स सारख्या रिअ‍ॅलिटी शोचे सूत्रसंचालनदेखील केले आहे. याशिवाय तो झलक दिखला जा, कौन जीतेगा बॉलिवूड का टिकट, इस जंगल से मुझे बचाओ आणि फियर फॅक्टर - खतरों के खिलाडी 7 मध्ये स्पर्धक म्हणून तो सहभागी झाला आहे.

36 वर्षीय जयने 2011 मध्ये अभिनेत्री माही विजशी लग्न केले. 2019 मध्ये त्यांची मुलगी ताराचा जन्म झाला. ताराचे क्यूट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तारा व्यतिरिक्त या जोडप्याने त्यांच्या केअर टेकरची दोन मुलेही दत्तक घेतली आहेत.

बातम्या आणखी आहेत...