आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • Bigg Boss 15: Mohsin Khan And Shivangi Joshi Were Offered Rs 4 Crore To Enter Bigg Boss, Discussions Are On With The Makers

बिग बॉस 15:मोहसिन खान आणि शिवांगी जोशी यांना 'बिग बॉस'साठी देण्यात आली आहे 4 कोटींची ऑफर, निर्मात्यांशी सुरू आहे चर्चा

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • बिग बॉस 15 येत्या 2 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे.

स्टार प्लसचा लोकप्रिय शो 'ये रिश्ता क्या कहलाता है' लवकरच ऑफ एअर होणार आहे. या मालिकेतील मुख्य कलाकार शिवांगी जोशी आणि मोहसिन खान यांना शो संपण्यापूर्वीच अनेक ऑफर्स येत आहेत. यापैकीच एक आहे रिअ‍ॅलिटी शो बिग बॉस 15. शिवांगी आणि मोहसिन या दोघांनाही हा शो साइन करण्यासाठी मोठी रक्कम देऊ केली जात आहे.

अलीकडेच स्पॉटबॉयने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता मोहसिन खान आणि शिवांगी यांना बिग बॉसची ऑफर मिळाली आहे. दोघेही तरुण आहेत आणि त्यांची फॅन फॉलोइंग प्रचंड आहे, ज्यामुळे निर्माते या दोघांना शोमध्ये घेण्यास उत्सुक आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, दोघांनाही 4 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली आहे जी मोठी रक्कम आहे.

सध्या निर्माते आणि मोहसिन-शिवांगी यांच्यात चर्चा सुरू आहे. 'ये रिश्ता क्या कहलाता है' हा शो या महिन्यात बंद होणार आहे आणि बिग बॉस 15 येत्या 2 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. शोमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना लवकरच कोविड 19 च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार क्वारंटाइन ठेवण्यात येणार आहे.

करण कुंद्रा, रोनित रॉय, डोनल बिष्ट, अमित टंडन, अविका गौर, अफसाना खान, नेहा मर्दा, सिम्बा नागपाल, निधी भानुशाली, बरखा बिष्ट, मीरा देवस्थळे, साहिल उप्पल हे सेलेब्स यंदा या शोमध्ये झळकणार असल्याची चर्चा आहे.

बातम्या आणखी आहेत...