आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिग बॉस 15:रिअ‍ॅलिटी शो बिग बॉस 15 मध्ये सहभागी होणार नाही रिया चक्रवर्ती, कायदेशीर अडचणी ठरले कारण

16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रियाला या शोमधून माघार घ्यावी लागली आहे.

अलीकडेच रिया चक्रवर्ती बिग बॉस 15 च्या सेटच्या बाहेर दिसली होती. यावेळी बिग बॉस 15 मध्ये सहभागी होणा-या स्पर्धक तेजस्विनी प्रकाश आणि दलजीत कौर तिच्यासोबत दिसल्या होत्या. त्यानंतर रिया चक्रवर्ती बिग बॉसच्या नव्या पर्वात सहभागी होणार असल्याची चर्चा रंगू लागली होती. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर रिया अचानक चर्चेत आली होती, अशा परिस्थितीत तिचे शोमध्ये सहभागी होणे शोचा टीआरपी वाढवू शकेल, अशी आशा व्यक्त केली गेली होती. पण आता ताज्या वृत्तानुसार, कायदेशीर अडचणींमध्ये अडकल्यामुळे रियाला या शोमधून माघार घ्यावी लागली आहे.

बॉलिवूड लाईफच्या वृत्तानुसार, रिया चक्रवर्तीच्या लीगल इश्यूमुळे तिला शोमध्ये सहभागी होता येणार नाहीये. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर रिया आणि तिचा भाऊ शौविक यांची नावे ड्रग्ज प्रकरणात समोर आली होती, त्यानंतर त्यांना अनेक दिवस पोलीस कोठडीत राहावे लागले होते.

तर टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, रिया चक्रवर्तीला पुन्हा चित्रपटांमध्ये परत यायचे आहे, ज्यासाठी ती साऊथ इंडस्ट्रीतील अनेक निर्मात्यांकडे फेऱ्या मारत आहे. चित्रपटात परतण्यासाठी रियाने बिग बॉसमध्ये जाण्यास नकार दिला असल्याचे म्हटले जात आहे. रियाला काही चित्रपट आणि वेब सिरीजसाठी ऑफर आल्याचे वृत्त आहे.

बिग बॉसच्या निर्मात्यांनी मोठी रक्कम देऊ केली
वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या रिया चक्रवर्तीचे बिग बॉस 15 मध्ये येणे टीआरपीसाठी फायदेशीर ठरू शकते. हेच कारण आहे की निर्मात्यांनी रियाला दर आठवड्याला 35 लाख रुपये म्हणजेच दररोज 5 लाख रुपये फी देऊ केली आहे.

हे आहेत शोचे कन्फर्म स्पर्धक
शोमध्ये सहभागी झालेल्या सेलेब्सची नावे निर्मात्यांनी कन्फर्म केली आहेत. उमर रियाज, डोनल बिष्ट, आकासा सिंग, अफसाना खान, सिम्बा नागपाल, करण कुंद्रा, शमिता शेट्टी, निशांत भट्ट, प्रतीक सहजपाल, विधी पांड्या, मिशा अय्यर, साहिल श्रॉफ, ईशान सहगल, विशाल कोटीयन, तेजस्वी प्रकाश हे सेलेब्स यंदा शोमध्ये स्पर्धक म्हणून दिसतील.

बातम्या आणखी आहेत...