आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिअ‍ॅलिटी शो:2 ऑक्टोबरपासून टीव्हीवर येणार 'बिग बॉस 15’, OTTवरील बिग बॉस संपल्याच्या दोन आठवड्यांनंतर होणार सुरू, सलमान खानच्या चित्रपटामुळे झाला बदल

किरण जैनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सूत्रसंचालनाचे 500 कोटी घेणार सलमान

गेल्या पाच आठवड्यांपासून डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रसारित होणारा रिअ‍ॅलिटी शो बिग बॉस ओटीटी आता शेवटच्या टप्प्यांत पोहोचला आहे. निर्माता करण जोहर सूत्रसंचालन करत असलेल्या या शोचा 18 आणि 19 सप्टेंबर रोजी ग्रॅण्ड फिनाले आहे. यात स्पर्धक दिव्या अग्रवाल, शमिता शेट्टी, राकेश बापट, निशांत भट, प्रतीक सहजपाल आणि नेहा भसीन फायनलमध्ये पोहोचले आहेत. दोन आठवड्यांनंतर हा शो टीव्हीवर 2 ऑक्टोबरपासून बिग बॉस 15 नावाने प्रसारित होणार आहे. सूत्रसंचालन अभिनेता सलमान खान करेल.

या सीझनमध्ये दिग्गज अभिनेत्री रेखाही दिसणार
सूत्राने सांगितले, सुरुवातीला ओटीटीवरील बिग बॉस संपल्यानंतर 'बिग बॉस 15’ टीव्हीवर सुरू होणार होते. मात्र सलमानचे काही चित्रपट अजून पूर्ण झाले नाहीत. त्यामुळे या शेड्यूलमध्ये बदल झाला आहे. आता निर्मात्यांनी दोन आठवड्यांनंतर टीव्हीवर प्रसारित करण्याचा निर्णय घेतला आहे. 'बिग बॉस 15’चे प्रीमियर भाग 2 आणि 3 ऑक्टोबरला प्रसारित होणार आहे. या सीझनमध्ये जंगल थीमचे आयोजन करण्यात येणार आहे. यात अभिनेत्री रेखा झाडाच्या रूपात दिसणार आहे. यातील स्पर्धक घरात जाण्यासाठी हे जंगल पार करताना दिसणार आहेत.

सूत्रसंचालनाचे 500 कोटी घेणार सलमान
सलमानला गेल्या सीझनपेक्षा या हंगामात सूत्रसंचालनासाठी सुमारे 10 टक्के अधिक मानधन दिले जाणार आहे. सलमानने त्याच्या मानधनात 15 टक्के वाढ करण्याची मागणी केली होती, वाहिनीने त्याला फक्त 10 टक्के वाढ दिली. गेल्या वर्षी, सलमानने सुमारे 450 कोटी मानधन घेतले होते. या वर्षी सुमारे 500 कोटींचा करार करण्यात आला आहे.

'खतरों के खिलाडी' चे स्पर्धकदेखील येणार घरात
स्पर्धकांबद्दल बोलायचे झाले तर, निर्मात्यांनी शोमध्ये सहभागी होण्यासाठी 'खतरों के खिलाडी” च्या काही स्पर्धकांशी संपर्क साधला आहे. ज्यात दिव्यांका त्रिपाठी, अर्जुन बिजलानी, सना मकबूल खान यांचा समावेश आहे. याशिवाय गौरव गेरा, अविका गौर, मानव गोहिल आणि टीना दत्तासोबतही निर्माते चर्चा करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...