आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिग बॉस 15:टीना दत्ता आणि मानव गोहिल यांना ऑफर झाला सलमान खानचा शो बिग बॉस 15, यंदा जंगल थीमवर आधारित असेल हा रिअ‍ॅलिटी शो

11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बिग बॉस 15 च्या घरात नसतील कोणत्याही सुविधा

एकीकडे वूटवर प्रसारित होत असलेला बिग बॉस OTT हा रिअ‍ॅलिटी शो गाजर आहे, तर दुसरीकडे बिग बॉस 15 ची तयारी देखील सुरु झाली आहे. सलमान खान होस्ट असलेल्या या शोचे काही मजेशीर प्रोमोही समोर आले आहेत, त्यानंतर आता शोमध्ये सहभागी होणाऱ्या काही सेलेब्सची नावे समोर येत आहेत. यामध्ये 'उतरन' फेम अभिनेत्री टीना दत्ता आणि 'शादी मुबारक' फेम टीव्ही अभिनेता मानव गोयल यांच्या नावाचा समावेश आहे.

ETimes च्या रिपोर्टनुसार, बिग बॉस 15 च्या निर्मात्यांनी रिअॅलिटी शोमध्ये सहभागी होण्यासाठी कलर्सचा शो उतरन आणि खतरों के खिलाडीमध्ये झळकलेल्या टीना दत्ताशी संपर्क साधला आहे. गेल्या वर्षी टीना बिग बॉस 14 मध्ये सहभागी होत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र तिने सोशल मीडिया पोस्टद्वारे हे वृत्त अफवा असल्याचे म्हटले होते. याशिवाय हा टीनाला अनेक वेळा ऑफर करण्यात आला आहे. पण यावेळी टीनाने सहमती दर्शवल्यास ती या शोमध्ये दिसू शकेल. वाहिनीच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टीनाने या शोमध्ये येण्यास होकार दिला आहे.

टीना व्यतिरिक्त, टीव्ही अभिनेता मानव गोयलला देखील या शोची ऑफर देण्यात आली आहे आणि त्याच्याशी यासंदर्भात चर्चा सुरू आहे. मानव शेवटचा कलर्सवरील मालिका शादी मुबारकमध्ये दिसला होता.

बिग बॉस 15 च्या घरात नसतील कोणत्याही सुविधा

अलीकडेच कलर्स वाहिनीने शोचा एक नवीन प्रोमो रिलीज केला आहे ज्यात होस्ट सलमान खान जंगलमध्ये विश्वसुनट्रीसोबत बोलत असल्याचे दिसत आहे. बॉलिवूडच्या एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा यांनी विश्वसुनट्री या बोलणा-या झाडाला आपला आवाज दिला आहे. या प्रोमोमध्ये सलमान खानने हिंट दिली आहे की या सीझनमध्ये स्पर्धकांना घरात कोणत्याही सुविधा मिळणार नाहीत. ऑक्टोबरपासून हा शो ऑन एअर होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...