आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबिग बॉस 16चा शनिवारचा एपिसोड अतिशय इमोशनल असणार आहे. कारण या पर्वातील सर्वाधिक चर्चेत ठरलेला स्पर्धक अब्दू रोजिकला हे घर सोडून जावे लागणार आहे. अचानक या शोमधून त्याची एक्झिट होणार आहे. त्यामुळे प्रेक्षकही संभ्रमात पडले आहेत.
हिंदी कलर्स वाहिनीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अब्दू रडताना दिसत आहे. तसेच ‘बिग बॉस’ ही अब्दूला घराबाहेर येण्यास सांगत आहेत. ‘बिग बॉस’ने अब्दूला घराबाहेर येण्यास सांगितल्यावर घरातील सदस्यही हैराण होतात. या प्रोमोमध्ये घरातील सदस्यही रडताना दिसत आहेत. तर अब्दूही इतर सदस्यांना मिठी मारुन ढसाढसा रडत आहे. पण अब्दूला घराबाहेर का जावे लागले? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.
अब्दू खरंच शोमधून बाहेर पडला की बिग बॉसची ही नवीन स्ट्रॅटेजी आहे हे तर आगामी एपिसोडमध्येच कळेल. पण सध्या अब्दूच्या बाहेर जाण्याने प्रेक्षकांनाही धक्का बसला हे नक्की.
1 ऑक्टोबरपासून बिग बॉस 16 सुरू झाला आहे. शोचा पहिला कन्फर्म स्पर्धक म्हणून अब्दू रोजिकचे नाव समोर आले होते. 19 वर्षीय अब्दूला एका आजाराने ग्रासले असून त्यामुळे त्याची उंची वाढली नाही. कमी उंचीमुळे त्याला बराच संघर्ष करावा लागला. कधी शाळेतून काढून टाकण्यात आले तर कधी कमी उंचीमुळे त्याची चेष्टा झाली. शाळेतील मुलांचे चेष्टेने मन भरले नाही तेव्हा वाटेत अडवून त्याला त्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. असे असूनही अब्दूने आशा सोडली नाही आणि देवावर आपली श्रद्धा ठेवली. आज त्याचे इंस्टाग्रामवर 3.5 मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत आणि बिग बॉसच्या घरात आपल्या बबली स्टाईलने तो प्रेक्षकांची मने जिंकत आहे.
चला तर मग जाणून घेऊया कोण आहे अब्दू रोजिक आणि त्याचा इथपर्यंतचा प्रवास कसा होता-
बिग बॉस सीझन 1 ऑक्टोबरपासून छोट्या पडद्यावर दाखल होणार आहे. शोबद्दल दररोज नवनवीन अपडेट्स समोर येत आहेत. दरम्यान, 27 सप्टेंबर रोजी बिग बॉसच्या निर्मात्यांनी पत्रकार परिषदेत शोच्या पहिल्या स्पर्धकाच्या नावाचा खुलासा केला. अब्दू रोजिक हा या शोचा पहिला स्पर्धक आहे. पत्रकार परिषदेत अब्दूबद्दल सांगताना सलमानने त्याला गाणे गाण्यास सांगितले, त्यानंतर गायकाने स्टेजवर मैंने प्यार किया आणि दिल दीवाना ही गाणी गायली. अब्दूचे गाणे ऐकून सलमान खूप प्रभावित झाला आणि त्याचे कौतूक करताना म्हणाला की, 'खूप छान, अब्दूला हिंदी समजत नाही, पण तो हिंदी गाणी खूप सुंदर गातो.' वाचा सविस्तर...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.