आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दु:खद:'बिग बॉस'चा माजी स्पर्धक हिंदुस्थानी भाऊ उर्फ ​​विकास पाठकला मातृशोक, आई ब-याच दिवसांपासून होती आजारी

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • विकास पाठक कायम आपल्या वादग्रस्त व्हिडिओंमुळे चर्चेत असतो.

'बिग बॉसच्या 13' व्या पर्वात झळकलेला विकास पाठक उर्फ हिंदुस्थानी भाऊच्या आईचे निधन झाल्याचे वृत्त आहे. त्याची आई गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होती. उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विकास पाठक कायम आपल्या वादग्रस्त व्हिडिओंमुळे चर्चेत असतो.

विकास पाठकच्या आईला कुठला आजार होता, याची माहिती मिळू शकलेली नाही. काही दिवसांपूर्वीच त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून आईच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करण्याची विनंती केली होती. विकासने आईसोबतचा एक फोटो शेअर करुन लिहिले होते, 'माझी आई लवकरात लवकर बरी व्हावी, यासाठी कृपया प्रार्थना करा'. ही पोस्ट 25 ऑक्टोबर रोजी वेरिफाय नसलेल्या त्याच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आली होती.

  • सिस्टमविरूद्ध बोलल्यामुळे सोशल मीडिया अकाऊंट झाले होते सस्पेंड

आपल्या वादग्रस्त व्हिडिओंमुळे हिंदुस्थानी भाऊ कायम चर्चेत असतो. अलीकडेच त्याने एकता कपूरविरोधात तक्रार दाखल केली होती. एकताने आपल्या सीरिजमध्ये आर्मी अधिका-यांचा अपमान केल्याचा आरोप त्याने केला होता. त्यानंतर त्याचा एक व्हिडिओ समोर आला होता. ज्यामध्ये तो म्हणाला होता की, जर कोणी असे वागले तर तो स्वतः त्याला धडा शिकवेल, सिस्टमसोबत माझे काही घेणे देणे नाही. देशाच्या व्यवस्थेचा अपमान केल्याबद्दल अनेकांनी त्याच्यावर टीका केली होती. टीकाकारांमध्ये बिग बॉस 14 ची नवीन वाइल्ड कार्ड कंटेस्टंट कविक कौशिकचाही समावेश होता. ज्यानंतर त्याचे सोशल मीडिया अकाऊंट सस्पेंड करण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...