आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रद्द झाला बिग बॉस शो:कोरोनाच्या दुस-या लाटेमुळे ऑफ एअर झाले बिग बॉस कन्नडचे 8 वे पर्व, घरी परतले सर्व स्पर्धक

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शो बंद होण्यापूर्वी यात 8 स्पर्धक होते.

बिग बॉस कन्नडचे आठवे पर्व अर्ध्यावर थांबवण्यात आले आहे. कोरोनाच्या दुस-या लाटेमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. हा शो दाक्षिणात्य सुपरस्टार किच्चा सुदीप होस्ट करत होता. शो बंद होण्यापूर्वी यात 8 स्पर्धक होते. शोच्या सोशल मीडिया पेजवर ही माहिती देण्यात आली आहे. कलर्स कन्नडचे बिझनेस हेड परमेश्वर गुंडकल यांनी यासंदर्भात एक निवेदन प्रसिद्ध केले आहे.

71 दिवस चालला शो
निवेदनात म्हटले आहे, 'कन्नड बिग बॉस सीझन 8 जवळपास 71 दिवस चालला. घराच्या आत उपस्थित सर्व 11 स्पर्धक जगातील लोक या महामारीसोबत कसा लढा देत आहेत, यापासून अनभिज्ञ होते. हे सर्व जण घरात आयसोलेशनमध्ये असल्याने सुरक्षित आहेत. आम्ही त्यांना बाहेरील सर्व सद्यस्थितीबद्दलची माहिती देऊन त्यांना उद्या घराबाहेर बोलवत आहोत. त्यांना आणि टीमला सुखरूप घरी पाठवण्याची व्यवस्था केली आहे,' असे या निवेदनात म्हटले गेले आहे.

सुदीप चित्रीकरणाला येऊ शकत नव्हता
गुंडकल म्हणाले - 'शेकडो दिवसांचे काम. एका टीममध्ये काम करणारे शेकडो लोक. मेहनतीने काम करणा-या टीमचे स्वप्न अर्धवट राहिले. हे कठीण होते, मात्र शांतपणे निर्णय घेण्यात आला.'
घरात आता 11 पैकी 8 स्पर्धक होते. यात अरविंद केपी, दिव्या उरुडुगा, दिव्य सुरेश, प्रशांत, चक्रवर्ती, निधी यांचा समावेश आहे. इतकेच नाही तर 25 मे पर्यंत वाढलेल्या लॉकडाऊनमुळे शोचा होस्ट सुदीपदेखील चित्रीकरणासाठी येऊ शकत नव्हता.

बातम्या आणखी आहेत...