आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • Bigg Boss Ott: Big Boss Contestant Muskan Jattana Aka Moose Is Bisexual, Said – I Attract With Boys, But I Want To Be With A Settled Girl

बिग बॉस OTT:बायसेक्शुअल आहे बिग बॉसची स्पर्धक मुस्कान जट्टना उर्फ मूस, म्हणाली - 'मला मुलं आवडतात पण मी लग्न एका मुलीसोबतच करेन'

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • केआरकेच्या निशाण्यावर आली होती मुस्कान जट्टाना

'बिग बॉस'चे 15 वे पर्व ओटीटीवर दाखल झाले आहे. हे नवे पर्व महिनाभर वूट या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम केले जाणार आहे. शो सुरु होताच यात हाय व्होटेज ड्रामा आणि भांडणं बघायला मिळत आहेत. या शोमधील सर्वात कमी वयाची स्पर्धक मुस्कान जट्टाना उर्फ मूस तिचा लूक आणि कपड्यांमुळे चर्चेत आहे. इतकेच नाही तर मूस हिने नुकत्याच केलेल्या खुलाशाने घरातील सदस्यांसह प्रेक्षकांचेही डोळे मोठे झाले आहेत. मूसने तिच्या सेक्युअ‍ॅलिटीवर एक मोठा खुलासा केला आहे.

मूस गुरुवारी तिचा सह-स्पर्धक प्रतीक सहजपालसोबत बोलत होती. यावेळी प्रतीकने मूसला मुली आवडतात की मुलं असा प्रश्न विचारला. त्यावर मूस म्हणाली, 'मी बायसेक्शुअल आहे. मला मुलं मुली दोन्ही आवडतात. मात्र मुलांकडे मी जास्त आकर्षित होते. पण जेव्हा संबंध बनवायची गोष्ट येते तेव्हा मुली माझ्यासाठी जास्त महत्वाच्या ठरतात. मला मुलं आवडतात पण मी लग्न एका मुलीसोबतच करेन,' असा धक्कादायक खुलासा तिने केला आहे.

केआरकेच्या निशाण्यावर आली होती मुस्कान जट्टाना
बातम्यांनुसार, 20 वर्षीय मुस्कान जट्टानाने न्यूड लाईव्ह सेशन केले आहे. यावर केआरके म्हणाला, 'मी यावर्षी बिग बॉस पाहिला नाही किंवा तो शो पाहण्याची माझी कोणतीही योजना नाही. या शोमध्ये मुस्कान जट्टाना नावाची एक मुलगी आहे जी न्यूड लाईव्ह सेशन करते, असे मला समजले आहे. जर अशा मुलीला शोमध्ये बोलावले जाऊ शकते तर राज कुंद्रा तुरुंगात का आहे?,' असा प्रश्न केआरकेने उपस्थित केला आहे. इतकेच नाही तर कायदा सर्वांसाठी समान असावा, असेही तो म्हणाला आहे.

बिग बॉस या शोमध्ये मुस्कान जट्टानाचे कोरिओग्राफर निशांत भट्ट आणि प्रतीक सहजपालसोबत चांगले बाँडिंग दिसत आहे. अनेकदा मुस्कान शोमध्ये अपशब्दाचा वापर करताना दिसते. मुस्कानचा भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंगसोबतही वाद झाला आहे. मुस्कानने तिच्या करिअरच्या कमेंट केले होते.

मुस्कान ऑस्ट्रेलियामध्ये जन्मली आणि वाढली आहे. तिचे आई- वडील पंजाब प्रातांतील मोहाली येथे राहणारे आहेत. यापूर्वीही अनेक मुद्द्यांवरून बेधडक बोलल्यामुळे मूस सोशल मीडियावर चर्चेत राहिली आहे.

बातम्या आणखी आहेत...