आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिग बॉस OTT:राज कुंद्राची मेहुणी शमिता शेट्टी स्पर्धक म्हणून बिग बॉस शोमध्ये पोहोचली, म्हणाली - 'कुटुंबावर संकट येण्याआधीच मी हा शो साइन केला होता'

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बिग बॉसमध्ये प्रवेश केल्यावर शमिता काय म्हणाली?

लोकप्रिय वादग्रस्त रिअॅलिटी शो 'बिग बॉस'चे नवीन पर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवर सुरू झाले आहे. 8 ऑगस्ट रोजी OTT प्लॅटफॉर्म वूट वर या शोचा प्रीमिअर झाला. या शोचे चाहते ओटीटी प्लॅटफॉर्मवर 24 तास सर्व स्पर्धकांच्या हालचाली बघू शकणार आहेत.

बिग बॉस 15 चे सुरुवातीचे सहा आठवडे प्रेक्षकांना ओटीटी प्लॅटफॉर्मवर बघता येणार आहेत. त्यानंतर हा शो कलर्स चॅनेलवर प्रसारित केला जाईल. चित्रपट निर्माता करण जोहर ओटीटी भाग होस्ट करत आहे तर सलमान खान टीव्हीवर शो होस्ट करताना दिसेल. ‘बिग बॉस ओटीटी’ मध्ये कोण स्पर्धक सहभागी होणार याची नावे आता समोर आली आहेत. गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री शिल्पा शेट्टीची बहीण शमिता शेट्टी ‘बिग बॉस ओटीटी’ शोमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चा होत्या. यावर आता शिक्कामोर्तब झाले. कारण या शोमध्ये शमिता शेट्टीची एंट्री झाली आहे.

बिग बॉसमध्ये प्रवेश केल्यावर शमिता काय म्हणाली?
मेहुणा राज कुंद्रा अश्लील चित्रपट प्रकरणात अडकल्यानंतर शिल्पा शेट्टी आणि तिच्या कुटुंबाच्या अडचणी वाढू लागल्या आहेत. त्यामुळे शमिता शेट्टी या शोमध्ये सामील होणार की नाही, यावर प्रश्नचिन्ह होता. पण शमिताने मात्र शोमध्ये सहभाग घेतला आहे. ‘बिग बॉस ओटीटी’च्या घरात एंट्री घेत असतानाच शमिताने या शोमध्ये सहभागी होण्यामागचे कारण सांगितले. शमिताने करण जोहरसमोर सांगितले की, कुटुंबावर संकट येण्याआधीच तिने शोसाठी कमिटमेंट दिली होती. ज्यावेळी सर्व काही सुरळीत होते तेव्हा कमिंटमेंट दिल्यानंतर अचानक माघार घेणे आपल्याला योग्य वाटत नसल्याने शोमध्ये सहभागी होत असल्याचे शमिता म्हणाली. यावेळी शमिताने शिल्पा शेट्टी किंवा राज कुंद्राचे नाव घेणे मात्र टाळले.

बिग बॉसमधील सेकंड इनिंग

शमिताची या रिअॅलिटी शोमध्ये भाग घेण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी ती 2009 मध्ये बिग बॉस 3 मध्ये स्पर्धक म्हणून दिसली होती. शमिता 34 दिवस येथे राहिली पण तिने शो मधूनच सोडला होता. त्यावेळी शमिताला तिची बहीण शिल्पा शेट्टीच्या लग्नाला उपस्थित राहायचे होते, त्यामुळे ती हा शो अर्धवट सोडून बाहेर आली होती.

20 वर्षांपूर्वी बॉलिवूडमध्ये केले होते पदार्पण
शमिता शेट्टीने 2000 मध्ये 'मोहब्बतें' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर ती 'झलक दिखला जा', 'फिअर फॅक्टर', 'खतरों के खिलाडी -9' मध्येही दिसली होती. शमिता गेल्या वर्षी 'ब्लॅक विडोज' या वेब सीरिजमध्ये दिसली होती.

बातम्या आणखी आहेत...