आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिग बॉस OTT:सलमान खान नव्हे करण जोहर करणार कॉन्ट्रोव्हर्शिअल शोचे सूत्रसंचालन, निर्मात्यांनी आणला शोमध्ये सर्वात मोठा ट्विस्ट

किरण जैन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बिग बॉसच्या ओटीटी व्हर्जनचे सूत्रसंचालन करणार करण जोहर

निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरने बॉलिवूड व्यतिरिक्त एंटरटेन्मेंट इंडस्ट्रीतील इतर क्षेत्रातही यशस्वी पाऊल ठेवले आहे. आतापर्यंत 'कॉफी विथ करण' हा टेलिव्हिजन टॉक शो आणि 'व्हॉट द लव्ह' हा डेटिंग शो त्याने होस्ट केला. याशिवाय 'कॉलिंग करण' हा रेडिओ शो आणि 'झलक दिखला जा', 'इंडियाज गॉट टॅलेंट', 'इंडियाज नेक्स्ट सुपरस्टार्स' सारख्या टीव्ही शोचे तो परीक्षण करताना दिसला आहे. आता या यादीत आणखी एका रिअ‍ॅलिटी शोचे नाव जोडले गेले आहे.

सूत्रानुसार, करण जोहर वादग्रस्त रिअ‍ॅलिटी शो बिग बॉसचे पुढचे सीझन होस्ट करताना दिसणार आहे. निर्माता एका छोट्या ट्विस्टमधून शो प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहेत. तो सलमान खानच्या जागीदिसणार आहे.

करणची शैली वेगळी असेल

शोच्या जवळच्या सूत्राने सांगितले की, "डिजिटल प्लॅटफॉर्मची वाढती लोकप्रियता लक्षात घेऊन निर्मात्यांनी टीव्हीऐवजी बिग बॉस या शोचा पुढील सीझन ओटीटी प्लॅटफॉर्मवर लाँच करण्याचा निर्णयघेतला आहे. 'बिग बॉस ओटीटी' चे पहिले सहा एपिसोड ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखवले जातील. हे सर्व एपिसोड विना एडिटिंगचे असतील. बिग बॉस हाऊसमधील 24x7 घडणा-या घडामोडी प्रेक्षकांनायात पाहता येईल. दरम्यान, या 6 भागांचे होस्ट करण्यासाठी निर्मात्यांनी करण जोहरला साइन केले आहे. ज्याप्रमाणे सलमान खान दर विकेण्डला स्पर्धकांशी बोलतो, एलिमिनेशन घोषित करतो,स्पर्धकांची कानउघडणी करतो, अगदी त्याप्रमाणे करणसुद्धा असेच काहीतरी करताना दिसणार आहे पण आपल्याच शैलीत."

करणची स्टाइल अगदी वेगळी आहे

करणला साइन करण्यामागील कारणांबद्दल विचारले असता एक सूत्राने सांगितले की, 'सुरुवातीचे सहा भाग अनकट असतील. त्यामुळे यावेळी प्रेक्षकांना स्पर्धकांच्या अशीअनेक व्यक्तिमत्त्वेपाहायला मिळतील जे बघून ते हैराण होतील. करणची हटके स्टाइल प्रेक्षकांना बिग बॉस ओटीटीच्या स्पर्धकांच्या जवळ आणेल. करणची त्याच्या प्रेक्षकांना हसवण्याची एक वेगळी स्टाइल आहे.निर्मात्यांना खात्री आहे की, करण या शोची लोकप्रियता वाढवण्यात त्यांना मदत करेल"

टीव्हीची कमान सलमानच सांभाळणार

करणच्या एंट्रीनंतर सलमानने या शोला अलविदा म्हटले का? हा प्रश्न नक्कीच तुमच्या मनात डोकावला असेल. तर तसे नाहीये. सहा भागानंतर जेव्हा शो टीव्हीवर प्रसारित होईल, तेव्हा सलमान खानचया शोचे सूत्रसंचालन करणार आहे. खरं तर सलमानलाच बिग बॉस ओटीटी होस्ट करण्याची ऑफर दिली होती. मात्र तो आपल्या इतर प्रोजेक्ट्समध्ये बिझी असल्याने इकडे वेळ देऊ शकला नाही. 'बिग बॉस OTT'चा पहिला एपिसोड 8 ऑगस्टला प्रसारित होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...