आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • Bigg Boss OTT: Shamita Shetty Became Emotional After Seeing Mother Sunanda Shetty, Asked On Raj Kundra Case – Did Jiju Come Out?

बिग बॉस ओटीटी:आई सुनंदा शेट्टीला पाहून शमिता शेट्टी झाली भावूक, राज कुंद्रा प्रकरणावर विचारले- जीजू बाहेर आलेत का?

12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुनंदा यांना घरात येताना पाहून शमिता भावूक होऊन रडू लागली.

रिअॅलिटी शो बिग बॉस ओटीटीचा फिनाले वीक सुरू झाला आहे. संडे का वार एपिसोडनंतर सर्व स्पर्धकांचे कुटुंबीय त्यांना भेटण्यासाठी आले होते. दरम्यान, शमिता शेट्टीचीआई सुनंदा शेट्टी बिग बॉसच्या घरात पोहोचल्या होत्या. आईला पाहून शमिता खूप भावूक झाली. संभाषणात शमिताने तिच्या आईजवळ तिची थोरली बहीण शिल्पा शेट्टी आणि भावोजी राज कुंद्रा यांच्याबद्दल चौकशी केली.

सुनंदा यांना घरात येताना पाहून शमिता भावूक होऊन रडू लागली. सर्व स्पर्धकांना बिग बॉसने फ्रीज केले होते. सुनंदा घरात आल्या आणि सांगितले की, बिग बॉसने माझ्या मुलीला रिलीज केले आहे. सुनंदा यांनी बिग बॉसच्या घरात येऊन आपल्या मुलीला खूप प्रोत्साहन दिले. या दरम्यान, शमिताने तिच्या आईला जीजू बाहेर आलेत का? शिल्पा कशी आहे? असे प्रश्न विचारले. सुरवातीला सुनंदा यांनी इशा-याने शमिताला समजावण्याचा प्रयत्न केला. मग सांगितले की, बाहेर सर्व ठीक आहे.

कोविड 19 प्रोटोकॉलमुळे बाहेरून येणाऱ्या सर्व लोकांना काचेच्या भिंतीच्या दुसऱ्या बाजूला ठेवण्यात आले होते. सुनंदा नेहा आणि राकेश यांच्याशीही बोलल्या आणि त्यांचे कौतुक केले. या दरम्यान, शमिताने आईला विचारले की राकेश चांगला आहे का, त्यावर तिच्या आईनेही राकेशचे कौतुक केले. सुनंदा यांनी सोबत येताना शमिताचा पाळीव कुत्रा फोबीचे छायाचित्र आणि कुटुंबातील सदस्यांसाठी मोदक आणले होते.

शमिता व्यतिरिक्त, दिव्या अग्रवालचा प्रियकर वरुण सूद, प्रतीक सहजपालची बहीण प्रेरणा, निशांत भट्टचा मित्र नृत्यदिग्दर्शक पुनीत पाठक, राकेश बापटची भाची आयेशा आणि नेहा भसीनची मोठी बहीण या शोमध्ये आली होती.

बातम्या आणखी आहेत...