आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिग बॉस OTT:शमिता शेट्टीचा खुलासा, म्हणाली- 'सह-स्पर्धक निशांत भट्टने त्याची मर्यादा ओलांडली होती'

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • निशांतने माझ्यासोबत असताना एकदा मर्यादा ओलांडल्या होत्या

बिग बॉस ओटीटीमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालेल्या शमिता शेट्टीने खुलासा केला की, तिचा सह-स्पर्धक, नृत्यदिग्दर्शक निशांत भट्टने एकदा त्याची मर्यादा ओलांडली होती. मंगळवारी पार पडलेल्या भागामध्ये शमिता आणि दिव्या अग्रवाल बिग बॉसच्या घरात गप्पा मारताना दिसत होत्या. शमिताने दिव्याला सांगितले की, एका शोमध्ये मला जाणवले होते की निशांतने त्याची मर्यादा ओलांडली आहे. त्यामुळे मला थोडे विचित्र वाटत होते. या घटनेनंतर तिने निशांतपासून अंतर ठेवण्याचा निर्णय घेतल्याचेही तिने सांगितले.

निशांतने माझ्यासोबत असताना एकदा मर्यादा ओलांडल्या होत्या
शमिता म्हणाली, "ती कोणती घटना आहे हे मला सांगायचे नाही, पण त्याने एकदा माझ्यासोबत असताना मर्यादा ओलांडल्या होत्या आणि मला ते अजिबात आवडले नव्हते. मी त्याला सांगितले की, तू जे काही केले ते चुकीचे आहे आणि त्यानंतर मी त्याच्याशी बोलणे बंद केले होते."

बिग बॉसमध्ये प्रवेश केल्यावर शमिता काय म्हणाली होती?
मेहुणा राज कुंद्रा अश्लील चित्रपट प्रकरणात अडकल्यानंतर शिल्पा शेट्टी आणि तिच्या कुटुंबाच्या अडचणी वाढू लागल्या आहेत. त्यामुळे शमिता शेट्टी या शोमध्ये सामील होणार की नाही, यावर प्रश्नचिन्ह होता. पण शमिताने मात्र शोमध्ये सहभाग घेतला आहे. ‘बिग बॉस ओटीटी’च्या घरात एंट्री घेत असतानाच शमिताने या शोमध्ये सहभागी होण्यामागचे कारण सांगितले. शमिताने करण जोहरसमोर सांगितले की, कुटुंबावर संकट येण्याआधीच तिने शोसाठी कमिटमेंट दिली होती. ज्यावेळी सर्व काही सुरळीत होते तेव्हा कमिंटमेंट दिल्यानंतर अचानक माघार घेणे आपल्याला योग्य वाटत नसल्याने शोमध्ये सहभागी होत असल्याचे शमिता म्हणाली. यावेळी शमिताने शिल्पा शेट्टी किंवा राज कुंद्राचे नाव घेणे मात्र टाळले.

बिग बॉसमधील सेकंड इनिंग

शमिताची या रिअॅलिटी शोमध्ये भाग घेण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी ती 2009 मध्ये बिग बॉस 3 मध्ये स्पर्धक म्हणून दिसली होती. शमिता 34 दिवस येथे राहिली पण तिने शो मधूनच सोडला होता. त्यावेळी शमिताला तिची बहीण शिल्पा शेट्टीच्या लग्नाला उपस्थित राहायचे होते, त्यामुळे ती हा शो अर्धवट सोडून बाहेर आली होती.

20 वर्षांपूर्वी बॉलिवूडमध्ये केले होते पदार्पण
शमिता शेट्टीने 2000 मध्ये 'मोहब्बतें' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर ती 'झलक दिखला जा', 'फिअर फॅक्टर', 'खतरों के खिलाडी -9' मध्येही दिसली होती. शमिता गेल्या वर्षी 'ब्लॅक विडोज' या वेब सीरिजमध्ये दिसली होती.

बातम्या आणखी आहेत...