आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • Bigg Boss OTT: Shamita Shetty Reveals About Carrying The Emotional Baggage Of Being Recognised As Shilpa Shetty’s Sister

बिग बॉस OTT:करण जोहरसमोर शमिता शेट्टीला अश्रू अनावर, म्हणाली- '20 वर्षांच्या करिअरनंतरही मला लोक ओळख फक्त शिल्पाची बहीण म्हणून ओळखतात, अद्याप माझा संघर्ष सुरु आहे'

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 15 ऑगस्टला शोचा पहिला वीकेंड का वार एपिसोड रंगला.

वूट डिजिटल प्लॅटफॉर्मवर लोकप्रिय वादग्रस्त रिअ‍ॅलिटी शो 'बिग बॉस ओटीटी' सुरू झाला आहे. 8 ऑगस्ट रोजी वूटवर या शोचा प्रीमिअर झाला. करण जोहर होस्ट करत असलेल्या शोमध्ये सहभागी होण्यासाठी अनेक सेलिब्रिटींची नावे पुढे आली होती, पण शेवटच्या क्षणी शमिता शेट्टीने शोमध्ये प्रवेश करून सर्वांना आश्चर्यचकित केले. शोला एक आठवडा पूर्ण झाला आणि 15 ऑगस्टला शोचा पहिला वीकेंड का वार एपिसोड रंगला.

करण शमिताच्या खेळाचे कौतुक करतो. आणि विचारतो की, तिने मनात काही साठवून ठेवले आहे का? या प्रश्नाचे उत्तर देताना शमिता आपले अश्रू आवरू शकली नाही. चित्रपटसृष्टीत 20-21 वर्षांचा लांबचा पल्ला गाठणे सोपे नव्हते, कारण आपल्याला कायम मोठी शिल्पा शेट्टीच्या सावलीत राहावे लागत होते, असे शमिता म्हणाली. पुढे ती म्हणते, माझ्यावर कायम शिल्पाची प्रोटेक्टिव शॅडो होती, ज्यासाठी मी स्वत: ला भाग्यवान समजते. पण एवढ्या वर्षांनंतरही आपली ओळख शिल्पा शेट्टीची धाकटी बहीण म्हणूनच झाली, याची खंत वाटत असल्याचे शमिताने सांगितले. मी प्रत्येकाला सांगू इच्छिते की मी स्वतः काय आहे. एवढ्या वर्षांनंतरही स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी संघर्ष करत असल्याचे शमिताने सांगितले.

बिग बॉसमधील सेकंड इनिंग

शमिताची या रिअॅलिटी शोमध्ये भाग घेण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी ती 2009 मध्ये बिग बॉस 3 मध्ये स्पर्धक म्हणून दिसली होती. शमिता 34 दिवस येथे राहिली पण तिने शो मधूनच सोडला होता. त्यावेळी शमिताला तिची बहीण शिल्पा शेट्टीच्या लग्नाला उपस्थित राहायचे होते, त्यामुळे ती हा शो अर्धवट सोडून बाहेर आली होती.

20 वर्षांपूर्वी बॉलिवूडमध्ये केले होते पदार्पण
शमिता शेट्टीने 2000 मध्ये 'मोहब्बतें' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर ती 'झलक दिखला जा', 'फिअर फॅक्टर', 'खतरों के खिलाडी -9' मध्येही दिसली होती. शमिता गेल्या वर्षी 'ब्लॅक विडोज' या वेब सीरिजमध्ये दिसली होती.

बातम्या आणखी आहेत...