आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबिग बॉस ओटीटी सीझन 1 ची विजेती दिव्या अग्रवालने बॉयफ्रेंड अपूर्व पाडगावकरसोबत साखरपुडा केला आहे. दिव्या अभिनेता वरुण सूदसोबत रिलेशनशिपमध्ये होती. ब्रेकअपच्या 9 महिन्यांनंतर तिने नवे नाते जोडले आहे. दिव्याच्या वाढदिवशी अपूर्व पाडगावकरने तिला प्रपोज केले आणि अंगठी घातली. या कपलचे खास फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
दिव्या अग्रवालने वाढदिवसाचे फोटो शेअर केले आहेत
दिव्याने बिझनेसमन अपूर्वसोबतचे खास फोटो शेअर केले आहेत. दिव्याने अपूर्वसोबत आपला वाढदिवस साजरा केला. पहिल्या फोटोमध्ये दिव्या अपूर्वला मिठी मारताना दिसत आहे, तर दुसऱ्या फोटोमध्ये अपूर्व तिच्या कपाळावर चुंबन घेत आहे. तिसऱ्या फोटोमध्ये दिव्या अपूर्वने घातलेली अंगठी फ्लाँट करताना दिसत आहे. इन्स्टाग्रामवर बॉयफ्रेंड अपूर्व पाडगावकरबरोबरचे फोटो शेअर करत दिव्याने लिहिले, "मी कधी हसणं बंद करू शकेन का? कदाचित नाही. माझ्या आयुष्यात प्रकाशाचा आणखी एक किरण आला आहे आणि आयुष्याचा हा प्रवास शेअर करण्यासाठी मला एक योग्य व्यक्ती मिळाली आहे. त्याची बायको, हे कायमचं वचन आहे. यापुढे मी कधीच एकटी चालणार नाही."
कोण आहे अपूर्व पाडगावकर?
अपूर्व पाडगावकर हा इंजिनिअर असून त्याने एमबीएही केले आहे. मुंबई शहरात त्याचे 4 रेस्तराँ आहेत. त्याचे मुंबईतील वाशी येथे 'द टाइट पब' आणि 'सोया स्ट्रीट' आणि वांद्रे येथे 'लेमन लीफ' आणि 'यलो टँग' नावाचे दोन रेस्तराँ आहेत. अपूर्व देखील इंस्टाग्रामवर खूप सक्रिय आहे. या सर्व गोष्टी अपूर्वाच्या बायोमध्ये लिहिल्या आहेत.
अपूर्वने फिल्मी स्टाइलमध्ये दिव्याला प्रपोज केले
सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये अपूर्व दिव्याला प्रपोज करताना दिसत आहे. अपूर्वाने दिव्याला अंगठी घातली. हा व्हिडिओ समोर आल्यापासून अनेक टीव्ही सेलिब्रिटी या जोडप्याला त्यांच्या नवीन आयुष्यासाठी शुभेच्छा देत आहेत.
वरुण-दिव्या 9 महिन्यांपूर्वी वेगळे झाले
यापूर्वी दिव्या अग्रवाल अभिनेता वरुण सूदसोबत रिलेशनशिपमध्ये होती. टीव्ही रिअॅलिटी शो Ace of Space दरम्यान दोघांची जवळीक वाढली होती, दोघांनी जवळपास 1 वर्ष एकमेकांना डेट केले. पण अचानक मार्चमध्ये दिव्या अग्रवालने तिच्या ब्रेकअपची घोषणा करून सर्वांना धक्का दिला होता. वरुणच्या आधी, दिव्या अग्रवाल स्पिल्ट्स व्हिला 14 फेम प्रियांक शर्मासोबत रिलेशनशिपमध्ये होती, बिग बॉस शो दरम्यान घरात प्रवेश केल्यानंतर दिव्याने प्रियांकसोबत ब्रेकअप केले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.