आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बिग बॉस सीझन 14 प्रिव्ह्यू:450 कोटींचे दुप्पट मानधन घेऊन होस्ट सलमान खान आज रात्री 9 वाजता करणार स्पर्धकांचे स्वागत; मागील पर्वातील विनर आणि रनर-अप होतील सहभागी

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हिना खान सिझलिंग परफॉर्मन्स देणार आहे.

बिग बॉस सीझन 14 आज रात्री 9 वाजता सुरू होईल. सलमान स्वत: हा शो होस्ट करत आहे. यंदा त्याने आपले मानधन दुप्पट केले आहे. या पर्वासाठी सलमानने तब्बल 450 कोटींची डील साइन केली आहे. या शोमध्ये बिग बॉस -13 चा विजेता सिद्धार्थ शुक्ला, बिग बॉस -7 ची विजेती गौहर खान आणि बिग बॉस 11 ची फर्स्ट रनर अप हिना खानदेखील सहभागी होणार आहे.

बिग बॉस सीझन 14 अपडेट्स...
हिना खान सिझलिंग परफॉर्मन्स देणार आहे.
कोरोनामुळे पहिल्यांदाच, व्हर्च्युअल प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून पत्रकारांना शोबद्दलची माहिती देण्यात आली.

सलमान सर्वात महागडा होस्ट
या संपूर्ण सीझनसाठी सलमान खान 450 कोटी रुपये घेत आहे. त्याला प्रत्येक भागासाठी 20 कोटी मिळतील. तीन महिन्यांचा हा करार 450 कोटी रुपयांवर झाला आहे. या सीझनसाठी सलमान दर आठवड्याला फक्त एक दिवस शूट करणार आहे. तो एकाचवेळी दोन भागांचे चित्रीकरण करणार आहे. म्हणजेच, सलमान प्रत्येक दिवसाच्या शूटसाठी 40 कोटी घेत आहे. तर बिग बॉस सीझन -13 साठी सलमान खानला 200 कोटी मिळाले होते.

हे आहेत यंदाचे स्पर्धक
बिग बॉस सीझन 14 मध्ये 12 स्पर्धक शोचा भाग असतील. यामध्ये निक्की तांबोळी, सारा गुरपाल, शाजाद देओल, ऐजाज खान, जान कुमार सानू, निशांत सिंह मलखानी, पवित्रा पुनिया, जास्मीन भसीन, रुबीना दिलाइक, अनुभव शुक्ला, राहुल वैद्य आणि राधे मां यांचा समावेश आहे.

गोरेगावमध्ये बनवलेल्या सेटवर मॉलही आहे
कोरोना काळात सुरु होत असलेल्या या शोचा सेट फिल्मसिटीमध्ये तयार करण्यात आला आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे हा सेट उभारायला उशीर झाला. त्यामुळे 27 सप्टेंबर रोजी होणारा ग्रॅण्ड प्रीमिअर 3 ऑक्टोबर रोजी होत आहे. सेटची खास वैशिष्ट्य म्हणजे यावेळी यामध्ये बीबी मॉल देखील असेल, तेथून घरातील सदस्यांना खरेदी करता येईल.

कोविडमुळे स्पा, थिएटर आणि मॉल हे सर्व बंद होते, ज्यामुळे निर्मात्यांनी त्या सर्व सुविधा स्पर्धकांसाठी घरात दिल्या आहेत. यावेळी स्पर्धकांसाठी घरात सर्व प्रकारच्या सुविधा ठेवण्यात आल्या आहेत.

कोरोना कालावधीत 45 दिवसांत घर उभारले गेले
बिग बॉस हाऊसचे आर्ट डायरेक्टर ओमंग कुमार असून त्यांनी या सीझनमध्ये 'बिग बॉस देगा 2020 को जवाब' या थीमनुसार घराची रचना करुन त्याला अल्ट्रामॉर्डन टच दिला आहे. ओमंग आणि त्यांची पत्नी वनिता यांनी सुमारे 45 दिवसांत 50 कामगारांसह मास्क आणि सामाजिक अंतराचे पालन करुन हे घर बांधले.

बातम्या आणखी आहेत...