आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइंडियन आयडॉल सीझन 2 या रिअॅलिटी शोचा विजेता संदीप आचार्यची आज बर्थ अॅनिव्हर्सरी आहे. संदीपचा जन्म 4 फेब्रुवारी 1984 रोजी राजस्थानच्या बीकानेर येथे झाला होता. जर तो आज हयात असता तर त्याने वयाची 38 वर्षे पूर्ण केली असती.
15 डिसेंबर 2013 रोजी आजाराने त्याचे निधन झाले. त्याला कावीळ झाला होता. गुडगाव येथील एका रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचे निधन झाले होते. निधनाच्या जवळपास दोन आठवड्यांपासून तो आजारी होता. त्याच्यावर प्रथम बीकानेर आणि त्यानंतर गुडगाव येथे रूग्णालयात उपचार करण्यात आले, पण संदीपला वाचवता आले नाही आणि वयाच्या 29 व्या वर्षी त्याचा मृत्यू झाला होता. संदीप कुटुंबातील एका विवाह सोहळ्यात सहभागी झाला होता. तिथेच त्याची प्रकृती बिघडली होती. त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, त्याने उपचारांना प्रतिसाद दिला नाही. दिवसेंदिवस प्रकृती बिघडत गेली होती. आजारपणाबाबत तो निष्काळजी होता, असेही सांगण्यात आले होते.
शालेय स्पर्धेत ठरला होता उपविजेता
संदीप सुरुवातीपासूनच शिक्षणात हुशार होता. आणि सायन्समध्ये त्याने ग्रॅज्युएशन केले होते. तो चार भावंडांपैकी सर्वात धाकटा होता. संदीपच्या गायन कौशल्याबद्दल त्याच्या कुटुंबियांना माहिती नव्हते. पहिल्यांदा त्याने शाळेच्या एका स्पर्धेत भाग घेतल्यानंतर त्यांचे हे कौशल्य सगळ्यांसमोर आले होते.
संदीप बिकानेरच्या एका शाळेत गायन स्पर्धेत उपविजेता ठरला होता. इथेच त्याला ओळख मिळाली आणि त्यानंतर त्याने शहरात अनेक परफॉर्मन्स दिले होते. बघता बघता तो आपल्या शहरातील एक स्टार बनला. त्यानंतर 2006 मध्ये त्याला इंडियन आयडॉलमध्ये भाग घेण्याची संधी मिळाली आणि तो या स्पर्धेचा विजेता ठरला. तेव्हा संदीप फक्त 22 वर्षांचा होता.
विशेष म्हणजे नेहा कक्कर देखील या पर्वात सहभागी झाली होती. मात्र तिस-या फेरीतच ती बाद झाली होती. विजेता ठरलेल्या संदीपला सोनी बीएमजी कडून 1 कोटीचा सिंगिंग कॉन्ट्रॅक्ट आणि एक लाख रुपये बक्षीस म्हणून मिळाले होते. इंडियन आयडॉल हा शो जिंकण्यापूर्वी तो गोल्डन व्हाईस ऑफ राजस्थान स्पर्धेचा उपविजेता ठरला होता. याशिवाय त्याने 9 एक्स या वाहिनीवरील 'जलवा', फोर टू का वन' आणि 'मिका टीम' या कार्यक्रमांमध्येही हजेरी लावली होती.
संदीपचे कुटुंबीय
चार भावंडांपैकी सर्वात लहान असलेल्या संदीपचे 2012 मध्येच लग्न झाले होते. त्याच्या पत्नीचे नाव नम्रता आचार्य आहे. निधनाच्या 20 दिवसआधी त्याच्या मुलीचा जन्म झाला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.