आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनीष पॉलचा वाढदिवस:मनीष पॉलने होस्ट म्हणून निर्माण केली स्वतःची वेगळी ओळख, चित्रपटांमध्येही केले काम, बालपणीच्या मैत्रीणीसोबत थाटले लग्न

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मनीषने 2007 साली संयुक्ता या त्याच्या मैत्रिणीसोबत लग्न केले.

आपल्या कॉमिक टायमिंगने प्रेक्षकांना खळखळून हसवणारा अभिनेता आणि कॉमेडीयन मनीष पॉल आज त्याचा 40 वा वाढदिवस साजरा करत आहे. रिअॅलिटी शो असो अथवा अवॉर्ड फंक्शन मनीषची उपस्थिती असली की प्रेक्षकांचे मनोरंजन होणार हे ठरलेले असते. मनीषने 2013 मध्ये 'मिक्की वायरस' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले पण त्याला फारसे यश मिळाले नाही.

मनीषचा जन्म 3 ऑगस्ट 1981 रोजी मुंबईत झाला, मात्र त्याचे बालपण दिल्लीत गेले. दिल्लीतील एपीजे स्कूल, शेख सराय येथून मनीषने आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर दिल्ली युनिव्हर्सिटीमधूनल व्होकेशनल स्टडीज कॉलेजमधून टुरिज्म या विषयात बीए पूर्ण केले. शालेय आणि महाविद्यालयीन जीवनातच मनीषने अँकरिंग सुरु केले होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो मुंबईत दाखल झाला.

करिअरची सुरुवात
मनीषला 2002मध्ये पहिल्यांदा 'संडे टेंगो' हा स्टार प्लस वाहिनीवरील शो होस्ट करण्याची संधी मिळाली. त्यानंतर झी म्युझिक वाहिनीसाठी व्हीजे म्हणून त्याने काम केले. रेडिओ सिटी या रेडिओ वाहिनीवर मनीषने रेडिओ जॉकी म्हणून 'कसाकाय मुंबई' हा शो होस्ट केला.

अभिनय करिअरची सुरुवात
मनीषने स्टार वनवर प्रसारित झालेल्या घोस्ट बना दोस्त या मालिकेत घोस्टची भूमिका वठवली होती. त्यानंतर त्याने 'राधा की बेटियां कुछ कर दिखाएंगी', 'जिंदादिल', 'शssss फिर कोई है', 'व्हील घर घर में', 'कहानी शुरू विथ लव गुरू' या मालिकांमध्ये अभिनय केला तसेच 'तीस मार खान' (2010) , 'मिक्की वायरस' यांसारख्या चित्रपटात काम केले.

शाळेतील मैत्रिणीबरोबर केले लग्न
मनीषने 2007 साली संयुक्ता या त्याच्या मैत्रिणीसोबत लग्न केले. मनीष आणि संयुक्ता शाळेत असल्यापासून एकमेकांना ओळखतात. त्यांनी 1998 साली डेटिंगला सुरुवात केली होती. आता मनीषला
एक मुलगी आणि मुलगा आहे. मनीष सोशल मीडियावर अॅक्टीव्ह आहे आणि पत्नी-मुलांबरोबरचे अनेक फोटो तो शेअर करत असतो. सध्या मनीष यूट्युबवर द मनीष पॉल पॉडकास्ट हा चॅट शो होस्ट
करतो. या शोमध्ये अनेक सेलेब्स त्यांच्या प्रवासाबद्दल सांगत असतात.

बातम्या आणखी आहेत...