आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बॉलिवूडची एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा लवकरच छोट्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. स्टार प्लस वाहिनीवरील आगामी ‘गुम है किसी के प्यार में’ या मालिकेत रेखा प्रस्तुतकर्ता म्हणून दिसणार आहेत. अलीकडेच त्यांनी मुंबईच्या वांद्रे येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये प्रोमोसाठीचे शूटिंग पूर्ण केले. फक्त 10 तासांच्या या शूटसाठी त्यांनी कोट्यवधीचे मानधन घेतल्याची चर्चा आहे.
View this post on InstagramA post shared by StarPlus (@starplus) on Sep 30, 2020 at 11:59pm PDT
शोचे शीर्षक रेखा यांच्या 'रामपूर का लक्ष्मण' (1975) चित्रपटातून घेण्यात आले आहे.
या शोशी संबंधित सूत्रांनी सांगितल्यानुसार, "शोचे शीर्षक रेखा यांच्या रामपूर का लक्ष्मण (1975) या चित्रपटातून घेण्यात आले आहे. शोच्या निर्मात्यांनी जेव्हा रेखा यांच्याशी यासंदर्भात चर्चा केली, तेव्हा त्या खूप आनंदी झाल्या. संभाषणादरम्यान रेखा यांनी सांगितले की हे त्यांचे सर्वात आवडते गाणे आहे. जेव्हा निर्मात्यांनी शोमध्ये त्यांना प्रेझेंटर म्हणून झळकण्याची ऑफर दिली, तेव्हा त्यांनी लगेचच त्याला होकार दिला. वेशभूषापासून ते हेअरल स्टायलिंग आणि मेकअपपर्यंत रेखा यांनी स्वतः आपला लूक फायनल केला."
वाहिनीने रेखा यांना सुमारे दोन कोटी रुपये मानधन दिले
सूत्रांनी पुढे सांगितल्यानुसार, “कोविड 19 चा धोका लक्षात ठेवून शोच्या टीमने वांद्रे येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये चित्रीकरण केले. येथे रेखा यांनी दहा तास चित्रीकरण केले. या प्रोमोसाठी वाहिनीने रेखा यांना तब्बल दोन कोटी रुपये दिले आहे. या शोसोबत रेखा यांचे नाव जुळल्यास त्याला बरीच प्रसिद्धी मिळेल, अशी आशा निर्मात्यांना आहे."
रेखा यांच्या चर्चित लव्ह स्टोरी प्रमाणेच हा शोसुद्धा प्रेमाच्या त्रिकोणावर आधारित आहे
'गुम है किसी के प्यार में' ही विराट चौहान या आयपीएस अधिका-याची कहाणी आहे. तो प्रेम आणि कर्तव्य यांच्यामध्ये अडकलेला दिसणार आहे. विराट (नील भट्ट) चे पत्रलेखा (ऐश्वर्या शर्मा) वर प्रेम आहे, परंतु काही परिस्थितीमुळे आणि आपले कर्तव्य बजावताना त्याला हुतात्मा झालेलेच्या मुलीशी (आयशा सिंग) लग्न करावे लागेल. रंजक बाब म्हणजे ही गोष्ट रेखा यांच्या वैयक्तिक जीवनाशी देखील जोडली जाऊ शकते. अमिताभ बच्चन - जया बच्चन - रेखा यांचा लव्ह ट्रँगल नेहमीच चर्चेत राहिला आहे.
'कसौटी जिंदगी के 2' शोला करणार रिप्लेस
हा नवीन शो 'कसौटी जिंदगी के 2' च्या जागी येणार आहे, ज्याचा प्रोमोही चॅनलने रिलीज केला आहे. दोन वर्षांपूर्वी 'कसौटी जिंदगी के 2' हा शोसाठी शाहरुख खान प्रेझेंटर म्हणून झळकला होता. या शोमध्ये शाहरुख नेरेटर म्हणून दिसला होता. शाहरुख आणि रेखा यांच्यापूर्वी अभिनेता सैफ अली खाननेदेखील 'कहा हम कहा तुम'साठी नेरेटरची भूमिका बजावली होती.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.