आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

राम मंदिर भूमिपूजनाचा आनंद:टीव्ही शो 'रामायण'चे राम म्हणाले - 'आजचा दिवस सुवर्ण अक्षरांमध्ये लिहिला जाणार' आणि सीता म्हणाली - 'यंदा दिवाळी लवकर आली'

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अरुण गोविल आणि दीपिका चिखलिया यांनी सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया देत आनंद व्यक्त केला आहे.

सिया राममय सब जग जानी करहुं प्रनाम जोरि जुग पानी... अयोध्येत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिर भूमिपूजनाचा ऐतिहासिक सोहळा पार पडणार आहे. यासाठी अयोध्या नगरी सजली असून देशभरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सामान्य लोकांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सगळेच या दिवसाची आतुरतेने वाट बघत होते. छोट्या पडद्यावरील गाजलेल्या 'रामायण' या मालिकेत राम आणि सीतेची भूमिका वठवणारे कलाकार अरुण गोविल आणि दीपिका चिखलिया यांनी सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया देत आनंद व्यक्त केला आहे.

  • अरुण म्हणाले ही दिव्य युगाची सुरुवात

अरुण गोविल यांनी भगवान राम यांच्या मंदिराची पायाभरणी आणि भूमिपूजनाबद्दल आनंद व्यक्त करणारे ट्विट केले आहेत. ते म्हणतात, सर्वजण भगवान श्री राम यांच्या मंदिराच्या पायाभरणीची वाट बघत आहेत. अयोध्येत भूमिपूजनाने दिव्य युगाची सुरुवात होईल.

आपल्या आणखी एका ट्विटमध्ये ते म्हणाले की, भारताच्या इतिहासात आजचा दिवस सुवर्ण अक्षरांमध्ये लिहिला जाणार आहे.

  • वाटतंय जणू यंदा दिवाळी लवकर आली

अरुण गोविल यांच्यासह अभिनेत्री दीपिका चिखलिया यांनीही आपला आनंद व्यक्त केला आहे. त्या म्हणतात, राम जन्मस्थळावर मंदिराची पायाभरणी होईल. शेवटी दीर्घ प्रतीक्षा संपली. रामलल्ला घरी परतत आहे. हा एक अद्भुत अनुभव असणार आहे. असं वाटतंय जणू यंदा दिवाळी लवकर आली आहे. या सर्वांचा विचार करून मी भावनिक होत आहे, असे त्या म्हणाल्या.

  • लॉकडाऊनमध्ये प्रसारित करण्यात आली होती मालिका

22 मार्चपासून देशात जाहीर झालेल्या लॉकडाऊन दरम्यान 33 वर्षानंतर डीडी नॅशनलवर 'रामायण' या मालिकेचे प्रसारण करण्यात आले होते. याकाळात या मालिकेने नवीन विक्रमाची नोंद केली होती. 16 एप्रिल रोजी हा शो तब्बल 7.7 कोटी प्रेक्षकांनी पाहिला होता.