आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूड ड्रग्ज प्रकरण:टीव्ही अभिनेता गौरव दीक्षितला 50 हजारांच्या जातमुचलक्यावर जामिन मंजूर, घरातून ड्रग्ज जप्त केल्यानंतर महिन्याभरापूर्वी झाली होती अटक

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ड्रग पॅडलरच्या जबाबानंतर झाली होती अटक

बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात अटकेत असलेला टीव्ही अभिनेता गौरव दीक्षित याला स्थानिक न्यायालयाने 50,000 रुपयांच्या जातमुचलक्यावर सशर्त जामिन मंजूर केला आहे. न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, तो परवानगीशिवाय शहराबाहेर जाऊ शकत नाही. या प्रकरणी आरोपपत्र दाखल होईपर्यंत गौरवला प्रत्येक सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी एनसीबी कार्यालयात हजेरी द्यावी लागेल. यापूर्वी एनसीबीने गौरवच्या सांगण्यावरून मुलुंड, खारघर, वसई, विरार, वांद्रे आणि अंधेरी भागात छापे टाकले होते.

ड्रग पॅडलरच्या जबाबानंतर झाली होती अटक
NCB ची ड्रग्जविरोधातील कारवाई मुंबईत सुरू आहे. आतापर्यंत, केंद्रीय एजन्सीने ड्रग्ज प्रकरणात अनेक नावाजलेल्या लोकांना अटक केली आहे आणि अनेक बॉलिवूड स्टार्सची चौकशीदेखील करण्यात आली आहे. गौरव दीक्षितला 27 ऑगस्ट रोजी एनसीबीने (NCB) मुंबईहून अटक केली होती. गौरवच्या घरावर एनसीबीकडून टाकण्यात आलेल्या छाप्यात एमडी ड्रग्ज, चरस आणि इतर ड्रग्स जप्त करण्यात आले होते. अभिनेता एजाज खान ड्रग्स प्रकरणातील चौकशीच्या आधारे गौरवला ही अटक करण्यात आली होती.

विशेष म्हणजे ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने एजाज खानला मार्च महिन्यात अटक केली होती. या प्रकरणात ड्रग पेडलर शादाब बटाटा याला अटक केल्यानंतर अभिनेता एजाज खान याचे नाव समोर आले होते. एजाज खानवर शादाब बटाटा यांच्या टोळीचा भाग असल्याचा आरोप आहे. शादाब बटाटा हा मुंबईतील सर्वात मोठा ड्रग्स सप्लायर फारुख बटाटा याचा मुलगा आहे. दरम्यान, एनसीबीने यापूर्वी जेव्हा शादाब बटाटाला याला अटक अटक केली होती तेव्हा सुमारे 2 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त करण्यात आले होते.

गौरवच्या मुंबईतील लोखंडवालास्थित घरातून जप्त करण्यात आलेले ड्रग्ज
गौरवच्या मुंबईतील लोखंडवालास्थित घरातून जप्त करण्यात आलेले ड्रग्ज

NCB ला यापूर्वी एप्रिल महिन्यात गौरव दीक्षितच्या मुंबईतील लोखंडवाला येथील घरी छाप्यात अंमली पदार्थ सापडले होते. मात्र, तेव्हा तो घरी नव्हता. त्यानंतर एनसीबीने त्याला आरोपी म्हणून घोषित केले आणि ते त्याच्या शोधात होते.

गौरवचा बॉलिवूड प्रवास

ड्रग्ज प्रकरणात नाव असलेले अभिनेता गौरव दीक्षित मुळचा भोपाळचा रहिवासी आहे आणि त्याने पॉवर इलेक्ट्रॉनिक्समधून बीई केले आहे. अभियांत्रिकी केल्यानंतर, नोकरी करण्याऐवजी गौरवने अभिनयाकडे आपला मोर्चा वळवला. 2006-2007 मध्ये त्याने गाजलेल्या 'मोहल्ला मोहब्बत वाला' या मालिकेत काम केले. गौरवने 'फन कॅन बी डेंजरस', 'बॉबी लव्ह अँड लस्ट', 'डायरी ऑफ बटरफ्लाय', 'द मॅजिक ऑफ सिनेमा', 'बुलेट राजा' आणि 'हॅपी भाग जायेगी' या चित्रपटांमध्येही काम केले. गौरवने 'सीता और गीता' या मालिकेतही काम केले आणि या शोमधील त्याचे 'राका' हे पात्र खूप लोकप्रिय झाले होते.

बातम्या आणखी आहेत...