आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चारू असोपा आणि राजीव सेन आले एकत्र:घटस्फोटाच्या चर्चादरम्यान शेअर केला फॅमिली फोटो, मुलगी जियानासोबत साजरा केला सण

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कपल चारू असोपा आणि राजीव सेन पुन्हा एकदा एकत्र दिसले आहेत. या दोघांनी गणेश चतुर्थीच्या निमित्ताने एक कौटुंबिक फोटो शेअर केला, ज्यामध्ये दोघेही त्यांच्या मुलीसोबत गणेशोत्सव साजरा करताना दिसले. राजीव आणि चारू यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर फॅमिली फोटो शेअर करत सर्वांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या. हे फोटो पाहिल्यानंतर दोघांमधील मतभेद दूर होऊन त्यांच्यात सारं काही आलबेल झाल्याचा अंदाज वर्तवला जातोय.

एकत्र आनंदाने दिसले हे कपल
31 ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थीच्या निमित्ताने या जोडप्याने त्यांच्या इन्स्टा हँडलवर घरी आयोजित केलेल्या पूजेचे फोटो शेअर केले होते.

यामध्ये राजीव, जियाना आणि चारू हे तिघेही आनंदाने कॅमेऱ्यासमोर पोज देताना दिसले. यासोबतच त्यांच्या घरी बसवलेल्या गणपती बाप्पाची झलकही फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे.

राजीव-चारु आणि जियाना व्यतिरिक्त, राजीवची आई शुभ्रा सेन देखील फोटोंमध्ये दिसत आहे. हे फोटो पाहून दोघांचे चाहते सुखावले आहेत.

जोडपे घटस्फोट घेणार होते
चारू आणि राजीव यांच्यात खूप दिवसांपासून मतभेद आहेत. इतकंच नाही तर यादरम्यान दोघांच्या घटस्फोटाच्या बातम्याही आल्या. आपल्या यूट्यूब चॅनेलद्वारे चारूने ती राजीवपासून घटस्फोट घेणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला होता.

लग्नानंतर अनेकदा निर्माण झाले मतभेद
चारू आणि राजीव यांचे 2019 मध्ये लग्न झाले. 2021 मध्ये या जोडप्याच्या मुलीचा जन्म झाला. तिचे नाव जियाना असे आहे. काही दिवसांनी दोघांमध्ये मतभेद झाल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या. शेवटी, 2022 मध्ये चारूने दुजोरा दिला की, ती राजीवला घटस्फोट देणार आहे, त्यानंतर चारू वेगळ्या घरात राहू लागली. मात्र, आता नवीन छायाचित्रे पाहता दोघेही एकत्र असल्याचे दिसून येत आहे.

बातम्या आणखी आहेत...