आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
'द कपिल शर्मा शो' च्या आगामी भागामध्ये नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्य, टेरेन्स लुईस आणि गीता कपूर खास पाहुणे म्हणून दिसणार आहेत. या भागाचा प्रोमो व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला गेला आहे. या व्हिडीओमध्ये गणेश आचार्य यांनी उघड केले की, आतापर्यंत त्यांनी जवळपास 100 किलो वजन कमी केले आहे. यावर कपिल शर्मा त्यांना गमतीने म्हणतोय की, तुम्ही दोन माणसांनाच गायब केलंत. गणेश यांचे वजन सुमारे 200 किलो पर्यंत वाढले होते. यानंतर, त्यांनी आपल्या शरीरावर लक्ष द्यायला सुरुवात केली आणि आतापर्यंत बरेच वजन कमी केले आहे.
या एपिसोडच्या प्रोमो व्हिडिओमध्ये कपिल शर्मा त्यांना त्यांच्या वजनाविषयी प्रश्न विचारतो. त्यावर जवळपास 100 किलो वजन कमी केल्याचे गणेश आचार्य यांनी सांगितले. हे ऐकून कपिल मस्करीत म्हणतो, “छोट्या शहरांमध्ये 46-46 किलो वजनाचे लोक असतात. तुम्ही तर दोन माणसांना गायब केलंत”. हे ऐकून सेटवर एकच हशा पिकतो. हा एपिसोड या विकेंडला प्रसारित होणार आहे.
'देहाती डिस्को'मध्ये लीड रोलमध्ये दिसणार गणेश
गणेश आचार्य लवकरच आगामी ‘देहाती डिस्को’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. गणेश यांनी अलीकडेच एका मुलाखतीत या चित्रपटाविषयी सांगितले. त्यांनी सांगितले की, 'हा अगदी वेगळ्या धाटणीचा चित्रपट आहे. माझ्या कॉमिक भूमिकेपेक्षा पूर्णपणे वेगळा. या चित्रपटात माझी गंभीर भूमिका आहे. यात अॅक्शन आणि डान्ससुद्धा आहे. मी दहा वर्षांचा मुलगा असलेल्या वडिलांची भूमिका साकारत आहे. हा हिंदुस्थानी कलाप्रकारांवर आधारित चित्रपट आहे. जेव्हापासून मी चित्रपटांचे दिग्दर्शन करीत आहे, तेव्हाचा सगळा अनुभव या भूमिकेसाठी मला उपयोगात आला आहे.' नृत्यदिग्दर्शक म्हणून गणेश यांनी अलीकडच्या काळात 'बेल बॉटम', 'लक्ष्मी', 'कुली नंबर 1', 'भुज' आणि 'तुफान' या प्रोजेक्टवर काम केले आहे.
एका मुलाखतीत सांगितली होती आपली वेट लॉस जर्नी
2017 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत गणेश यांनी आपली वेट लॉस जर्नी शेअर केली होती. “माझ्यासाठी हे फार कठीण होते. जवळपास दीड वर्ष मी माझ्या शरीरावर मेहनत घेतली. 2015 मध्ये माझ्या 'हे ब्रो' या चित्रपटासाठी मी 30 ते 40 किलो वजन वाढवले होते. त्यानंतर माझे एकूण वजन 200 किलोच्या आसपास गेले होते. काहीही करून हे वजन कमी करण्याचा निर्धार मी केला. लोकांनी गणेश आचार्यला जाड असल्याचंच पाहिलंय. मला माझी प्रतिमा बदलायची होती,” असे ते म्हणाले होते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.