आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • Choreographer Geeta Kapur Responds To Marriage Rumours After Pics Of Her Wearing 'sindoor' Getting Viral And Leave Fans Confused

भांगात कुंकु असलेल्या फोटोवर स्पष्टीकरण:कोरिओग्राफर गीता कपूरने सांगितले व्हायरल झालेल्या फोटोमागचे सत्य, म्हणाली - जर माझे लग्न झाले तर मी अजिबात लपवणार नाही

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शोच्या लेटेस्ट एपिसोडसाठी भांगात लावले होते कुंकू

प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका गीता कपूरने सोशल मीडियावर आपला एक फोटो शेअर केला होता. हा फोटो चर्चेचा विषय बनला आहे. या फोटोमध्ये गीताने लाल रंगाचा अनारकली ड्रेस घातला आहे. यावर तिने हेवी दागिने घातले आहेत. यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे तिने भांगात कुंकू सिंदूर लावले आहे. ते पाहुन गीताने गुपचूप लग्न केले असल्याचा अंदाज बांधल्या जात आहे. मात्र आता गीताने यावर खुलासा करुन सर्व चर्चांना पूर्णविराम लावला आहे. एका मुलाखतीत गीताने सांगितले की, तिने लग्न केलेले नाही. सोबतच काही महिन्यांपूर्वीच गीताने आपल्या आईला गमावले आहे, आणि अशा परिस्थितीत लग्नाचा विचारदेखील करु शकत नसल्याचे गीताने स्पष्ट केले आहे.

माझे लग्न झालेले नाही, जर झाले तर लपवणार नाही
गीताने तिच्या व्हायरल झालेल्या फोटोजबद्दल एका न्यूज वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत म्हटले, 'नाही.. माझे लग्न झालेले नाही. जर मी लग्न केले, तर ते तुमच्यापासून लपवणार नाही. मी एवढ्यात लग्न करणारदेखील नाही. काही महिन्यांपूर्वीच मी माझ्या आईला गमावले आहे. अशा परिस्थितीत मी लग्नाचा विचारदेखील करु शकत नाही,' असे गीता कपूर म्हणाली.

शोच्या लेटेस्ट एपिसोडसाठी भांगात लावले होते कुंकू
भांगात कुंकू का लावले, याबद्दल सांगताना गीता कपूर म्हणाली, ‘होय, मी भांगात कुंकू लावले आहे. खरंतर सुपर डान्सर चॅप्टर 4च्या आगामी भागामध्ये आम्ही बॉलिवूड क्वीन स्पेशल भाग शूट करत होतो. म्हणून मी माझ्या आवडत्या अभिनेत्री रेखा यांना एक छोटीशी भेट दिली आहे. जर माझे लग्न झाले तर मी अजिबात लपवणार नाही. इतक्या आनंदाची गोष्ट मी सर्वांसोबत शेअर करेन.’

मी यापूर्वीही अनेकदा लावले कुंकू
यापूर्वीही अनेकदा भांगात कुंकू लावल्याचे गीता कपूरने सांगितले. याविषयी ती म्हणाली, 'मी यापूर्वीही अनेकदा कुंकू लावले आहे. मी भगवान शिवची भक्त आहे, त्यामुळे दर सोमवारी पूजेनंतर मी भांगात कुंकू लावले. होळीसारख्या सणालादेखील कुंकू लावत असते.'

फोटो बघून नेटक-यांनी दिल्या होत्या अशा प्रतिक्रिया

गीताचा हा फोटो पाहुन एका सोशल मीडिया यूजरने लिहिले.. ”मां की मांग में सिंदूर। मां की शादी कब हुई?’ दुसऱ्याने लिहिले, “सिंदूर किसके नाम का है गीतू मां?’

47 वर्षीय गीता कपूर आहे अविवाहित
खरंतर, गीता कपूर जुलाईमध्ये 48 वर्षाची होणार आहे. आतापर्यंत तिने लग्न केले नाही. पण अनेकदा तिचे नाव मॉडेल, अभिनेता आणि दिग्दर्शक राजीव खिलजीसोबत जुळले आहे. राजीवच्या सोशल मीडिया अकाउंटवर दोघांचे अनेक फोटो बघायला मिळतात. मात्र गीता किंवा राजीव यांनी याबद्दल अधिकृतरित्या कधीही काहीही सांगितले नाही.

'साथिया'सह अनेक चित्रपटांची आहे कोरिओग्राफर
गीताच्या फिल्मी करिअरविषयी सांगायचे म्हणजे, वयाच्या 15 व्या वर्षापासून गीता फराह खानसोबत काम करत आहे. 'कुछ कुछ होता है', 'दिल तो पागल है', 'कभी खुशी कभी गम' आणि 'मोहब्बतें'सारख्या चित्रपटांसाठी गीताने फराहला असिस्ट केले. कोरिओग्राफर म्हणून तिने 'फिजा', 'अशोका', 'साथिया', 'हे बेबी', 'तीस मार खान' आणि 'तेरे नाल लव हो गया' या चित्रपटांसाठी काम केले आहे. तिने 'सुपर डांसर'शिवाय 'डांस इंडिया डांस', 'इंडियाज बेस्ट डांसर' आणि 'डीआयडी लिटल चॅम्प्स' या डांसिंग रिअॅलिटी शोसाठी परीक्षक म्हणून काम केले आहे.

बातम्या आणखी आहेत...