आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

दुःखद:'छोटी सरदारनी' या मालिकेत झळकलेल्या अभिनेत्यावर कोसळला दुःखाचा डोंगर, वडिलांचे कोरोनामुळे निधन; आईलाही झाला संसर्ग

मुंबई13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अमल सध्या त्याच्या आईसोबत दिल्लीत आहे, तर त्याची पत्नी मुंबईत आहे.
Advertisement
Advertisement

छोट्या पडद्यावरील 'ये रिश्ता क्या कहलाता है' आणि 'छोटी सरदारनी' या मालिकांमध्ये झळकलेला अभिनेता अमल सहरावत याच्या कुटुंबावर कोरोनामुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गेल्या महिन्यात कोरोनामुळे त्याच्या वडिलांचे निधन झाले तर त्याच्या आईलाची कोरोनाची चाचणी देखील पॉझिटिव्ह आली होती. अमलने आपल्या इंस्टाग्राम पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे.

  • कुटुंबासाठी परीक्षेची वेळ

अमलने आपल्या पोस्टमध्ये लिहिले, प्रिय इंस्टाग्राम फॅमिली, गेल्या काही दिवसांपासून इंस्टाग्रामवर सक्रिय नसल्यामुळे मी तुमच्या मेसेजला उत्तर देऊ शकलो नाही आणि त्या बद्दल मी तुमची माफी मागतो. गेल्या महिन्यात माझे वडील राज बेल सिंह यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तसेच माझ्या आईची कोरोना चाचणी दोनदा पॉझिटिव्ह आली होती.

अमलने पुढे लिहिले, सध्याचा काळ हा माझ्यासाठी आणि कुटुंबीयांसाठी देखील खूप कठीण आहे. मात्र माझे वडील आमच्यासाठी खूप सुंदर आठवणी सोडून गेले आहेत, ज्याद्वारे आम्हाला पुढे जायचे आहे. माझ्या कठीण काळामध्ये मला पाठिंबा दिल्याबद्दल सर्व मित्रांचे, कुटुंबीयांचे तसेच छोटी सरदारनी मालिकेच्या संपूर्ण टीमचे मनापासून आभार, असे तो म्हणाला आहे.

कोरोनाचा संसर्ग झाल्याचे कळताच घाबरुन जाऊ नका. डॉक्टरांनी दिलेल्या सर्व सुचनांचे पालन करा. कोरोनाची कोणतीही लक्षणे जाणवली तरी तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधा, असेही अमलने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

  • वडिलांना कोरोनाची लक्षणे नव्हती

टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत अमल म्हणाला, "माझ्या वडिलांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळली नव्हती. एका वेगळ्या कारणामुळे वडिलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण तेथे जेव्हा कोरोना चाचणी करण्यात आली तेव्हा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. त्यानंतर मी क्षणभरच त्यांना बघू शकलो होतो. आयसीयूत उपचारादरम्यान त्यांना कार्डियक अरेस्ट आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांची उणीव कधीही भरुन न निघणारी आहे', असे अमलने म्हटले.

अमलने पुढे सांगितले की, कोरोनामुळे माझ्या वडिलांचा मृत्यू झाला. पण मधुमेह असूनदेखील माझ्या आईने कोरोनावर मात केली आहे. ती आता ठिक आहे. माझे वडील माझ्या आईला आयरन लेडी म्हणायचे आणि ते खरे आहे, असे तो म्हणाला. अमल सध्या त्याच्या आईसोबत दिल्लीत आहे, तर त्याची पत्नी मुंबईत आहे.

Advertisement
0