आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासीआयडी या प्रसिद्ध टीव्ही शोमध्ये इन्स्पेक्टर सचिनची भूमिका साकारणारा अभिनेता ऋषीकेश पांडेसोबत मुंबईत लुटीची घटना घडली आहे. झाले असे की, ऋषीकेश त्याच्या कुटुंबासोबत एसी बसने फिरायला निघाला होता. त्याचवेळी त्याच्या स्लिंग बॅगेतून कोणीतरी रोख रक्कम आणि काही कागदपत्रे चोरून नेली. त्याने सांगितल्यानुसार, ही घटना 5 जून रोजी घडली, त्यावेळी तो आपल्या कुटुंबासह 'एलिफंटा केव्ह'ला भेट देण्यासाठी गेला होता.
बसमधून चोरीला गेले ऋषीकेशचे सामान
याबाबत बोलताना ऋषीकेश म्हणाला, "आम्ही संध्याकाळी 6.30 च्या सुमारास एसी बसमध्ये बसलो होतो. मी बसमधून खाली उतरताच माझी स्लिंग बॅग तपासली, तेव्हा माझे पैसे, क्रेडिट कार्ड्स, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि कारची कागदपत्रे काहीच तिथे नव्हती. मी कुलाबा आणि मालाड या दोन्ही पोलिस ठाण्यात घटनेची तक्रार नोंदवली आहे."
सीआयडीमध्ये प्रकरणं सोडवत असत
अभिनेता पुढे म्हणाला, "मी सीआयडीमध्ये इन्स्पेक्टरची भूमिका साकारली होती. शोमध्ये लोक आमच्याकडे तक्रारी घेऊन यायचे आणि आम्ही त्या सोडवायचो. प्रत्यक्ष जीवनातही लोक त्यांच्या अडचणी घेऊन माझ्याकडे आले आहेत आणि मी त्यांना मदत केली आहे. आणि आता मात्र माझ्यासोबतच लुटीची घटना घडली आहे. मला आशा आहे की पोलिस विभाग या प्रकरणाची सखोल चौकशी करेल."
CID च्या स्टारकास्टचे रीयुनियन
ऋषीकेश नुकताच सीआयडीच्या स्टारकास्टसोबत रियुनियनमध्ये दिसला होता. दयानंद शेट्टी (सीनियर इन्स्पेक्टर दया), आदित्य श्रीवास्तव (सीनियर इन्स्पेक्टर अभिजीत), दिनेश फडणीस (इन्स्पेक्टर फ्रेड्रिक), जानवी छेडा (सब इन्स्पेक्टर श्रेया), हृषिकेश पांडे (इन्स्पेक्टर अभिमन्यू), अजय नागरथ (सब इन्स्पेक्टर पंकज) या गेट टु गेदरमध्ये सहभागी झाले होते.
हा शो 21 वर्षे चालला
सीआयडी या मालिकेने एक काळ गाजवला आहे. हा शो तब्बल 21 वर्षे चालला. 21 जानेवारी 1998 रोजी छोट्या पडद्यावर दाखल झालेल्या या मालिकेचा शेवटचा भाग 27 ऑक्टोबर 2018 रोजी प्रसारित झाला होता. नोव्हेंबर 2004 मध्ये या मालिकेचे नाव लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले. या मालिकेतील 'दया दरवाजा तोड दो' आणि 'दाल में कुछ काला है' सारखे संवाद खूप लोकप्रिय झाले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.