आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुन्हा एकदा बाबा झाला विनोदवीर:कपिल शर्मा आणि गिन्नी चतरथला पुत्ररत्न, पोस्ट शेअर करत दिली गोड बातमी

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कपिल शर्माने सोशल मीडियावर ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

कॉमेडियन कपिल शर्माच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. कपिल आणि त्याची पत्नी गिन्नी यांना मुलगा झाला आहे. 1 फेब्रुवारी रोजी पहाटे गिन्नी चतरथने मुलाला जन्म दिला. कपिल शर्माने सोशल मीडियावर ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. कपिलने गिन्नी आणि त्यांचे बाळ दोघेही सुखरुप असल्याचे सांगितले आहे. कपिल शर्माला याआधारी एक मुलगी अनायरा असे तिचे नाव आहे. 2019 मध्ये अनायराचा जन्म झाला.

कपिल शर्माने पहाटे 5.30 वाजता एक पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे की, “नमस्कार, आज सकाळी आमच्या घरी मुलाने जन्म घेतला आहे. ईश्वराच्या कृपेने बाळ आणि आई दोघंही चांगले आहेत. तुमच्या प्रेम आणि प्रार्थनांसाठी आभार. गिन्नी आणि कपिल.”

या पोस्टनंतर कपिल आणि गिन्नी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय.

काही दिवसांपूर्वी कपिलने पत्नीच्या गरोदरपणाची केली होती पुष्टी
काही दिवसांपूर्वी स्वत: कपिलने सोशल मीडियावर त्याची पत्नी गिन्नी दुस-यांदा गरोदर असल्याची पुष्टी केली होती. सोशल मीडियावर एका नेटक-याने 'द कपिल शर्मा शो' का बंद होतोय, असा प्रश्न कपिलला विचारला होता. त्यावर “मला माझ्या दुसऱ्या बाळाच्या स्वागतासाठी पत्नीसोबत घरी काही वेळ घालवायचा आहे”, असे उत्तर कपिलने दिले होते. विशेष म्हणजे या उत्तरातून तो दुसऱ्यांदा बाबा होणार असल्याचे त्याने जाहीर केले होते.

बातम्या आणखी आहेत...